---Advertisement---

अफगाणिस्तानविरुद्ध रोहितची बॅट तळपली, तर टी२०च्या ‘या’ विक्रमात मारेल बाजी; बनेल केवळ दुसरा भारतीय

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 4:08 PM
---Advertisement---

बुधवार रोजी (०३ नोव्हेंबर) भारत आणि अफगाणिस्तान हे संघ आमने सामने येणार आहेत. टी२० विश्वचषक २०२१ च्या सुरुवातीच्या दोन्हीही सामन्यांमध्ये पराभवास सामोरे जावे लागल्याने भारतीय संघासाठी हा सामना करा वा मरा असणार आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीतील त्यांची दावेदारी अजून प्रबळ करण्यासाठी मैदानावर उतरेल. या सामन्यात उभय संघातील खेळाडूंच्या निशाण्यावर काही विक्रम असतील. त्याच विक्रमांकावर एक नजर टाकूया…

विराट कोहली करू शकतो हा विक्रम
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ९ षटकार मारल्यास तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील आपले १०० षटकार पूर्ण करेल. असा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज बनेल. कोहलीने आतापर्यंत ९१ टी२० सामन्यांमध्ये ८६ डावांमध्ये फलंदाजी करताना एकूण ९१ षटकार मारले आहेत. त्याच्यापूर्वी रोहित शर्मा सर्वाधिक १३४ षटकारांसह या विक्रमांत अव्वलस्थानी आहे.

केएल राहुलच्या पूर्ण होऊ शकतात ५५०० धावा
अफगानिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर केएल राहुलच्याही निशाण्यावर एक विक्रम असणार आहे. त्याने या सामन्यात केवळ ११ धावा जरी केल्या तर तो ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील आपल्या ५५०० धावा पूर्ण करेल. राहुलने आतापर्यंत १६७ ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळताना ५४८९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी नाबाद १३२ धावा राहिली आहे. तसेच त्याने ४ शतके आणि ४५ अर्धशतके केली आहेत.

रोहित शर्मा करू शकतो हा विक्रम
अफगाणिस्तानविरुद्ध ४० धावा फटकावत रोहित शर्माही मोठ्या विक्रमाचा मानकरी बनू शकतो. ४० धावांच्या खेळीसह तो ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील आपल्या ९५०० धावा पूर्ण करेल. असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज बनेल. रोहितव्यतिरिक्त भारतीय कर्णधार विराट कोहलीने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०२०२ धावा केल्या आहेत. तर रोहितने ९४६० धावा केल्या आहेत.

हार्दिक पंड्याकडे शतक पूर्ण करण्याची संधी
विराट कोहलीप्रमाणेच भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडेही षटकारांचे शतक पूर्ण करण्याची संधी असेल. जर त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ४ षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले १०० षटकार पूर्ण करेल. त्याने आतापर्यंत ११ कसोटी सामन्यांमध्ये १२ षटकार, ६३ वनडे सामन्यांमध्ये ५४ षटकार आणि ५१ टी२० सामन्यांमध्ये ३० षटकार मारले आहेत.

राशिद खानच्या निशाण्यावर असेल हा विक्रम
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान भारताविरुद्धच्या सामन्यात एक विक्रम करू शकतो. तो भारताविरुद्ध केवळ १ विकेट घेताच तो ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील आपल्या ४०० विकेट्स पूर्ण करेल. राशिदने आतापर्यंत ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये २८७ सामने खेळताना ३९९ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

विक्रम राठोड पुन्हा टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक बनण्यास उत्सुक; म्हणाले, ‘अजून खूप काम बाकी’

न्यूझीलंडचे ‘मिशन सेमीफायनल’! स्कॉटलंडविरूद्ध ‘या’ रणनितीने उतरणार मैदानावर

वातावरण तापलं! डी कॉकचे सलग २ चौकार अन् बांगलादेशी गोलंदाजांचा चढला पारा, केली शिवीगाळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---