नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाला 177 धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी सलामीला उतरलेल्या कर्णधार रोहित शर्मा याने डावाच्या दुसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावले. त्याने यादरम्यान एकूण 212 चेंडूंचा सामना करत 120 धावा चोपल्या. दुसरीकडे, विराट कोहली हा मात्र फक्त 12 धावा करून तंबूत परतला. मात्र, हे दोन्ही फलंदाज मैदानावर फलंदाजी करत असताना रोहित धावबाद होण्यापासून थोडक्यात बचावला. यानंतर विराटने रोहितची माफी मागितली. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
काय घडली घटना?
ही घटना भारतीय डावाच्या 48व्या षटकादरम्यान घडली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नेथन लायन हा गोलंदाजी करत होता. लायनच्या चेंडूवर विराट कोहली (Virat Kohli) याने मिड विकेटच्या दिशेने चेंडू मारला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या एका क्षेत्ररक्षकाने तातडीने चेंडू पकडत रोहित शर्मा याच्या दिशेने थेट स्टंप्सला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, डाईव्ह मारत रोहित क्रीझपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला. यावेळी विराटने त्याच्या चुकीसाठी रोहितची माफीही मागितली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
— Nitin Varshney (@NitinVa15588475) February 10, 2023
एका चुकीमुळे हुकले असते शतक
भारतीय विस्फोटक फलंदाज विराटच्या एका चुकीमुळे रोहित शर्मा याला शतकाला मुकावे लागले असते. रोहित 48व्या षटकादरम्यान त्याच्या शतकाच्या जवळ होता. जर तो बाद झाला असता, तर त्याला शतक ठोकता आले नसते. रोहितने टॉड मर्फी (Todd Murphy) टाकत असलेल्या 63व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारत शतक झळकावले.
रोहितचे आंतरराष्ट्रीय कसोटीतील 9वे शतक
रोहितने यावेळी 212 चेंडूंचा सामना करताना 2 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 120 धावा चोपत शतक साकारले. हे त्याचे कसोटीतील 9वे शतक ठरले. विशेष म्हणजे, भारतात फलंदाजी करताना रोहितचे हे 8वे शतक होते. (ind vs aus 1st cricketer virat kohli say sorry to rohit sharma for misunderstanding in taking single video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का! स्टार क्रिकेटरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
“विराटची विकेट माझ्यासाठी स्पेशल”, पदार्पण गाजवणाऱ्या मर्फीची प्रांजळ कबुली