---Advertisement---

जगातल्या नंबर 1 गोलंदाजापुढे ट्रेविस हेड क्लीन बोल्ड! व्हिडिओ व्हायरल

On: शुक्रवार, मार्च 17, 2023 3:42 PM
Mohammad Siraj Travis Head
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. उभय संघांतील ही तीन सामन्यांची वनडे मालिका शुक्रवारी (17 मार्च) सुरू झाली. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर पहिला सामना खेळला जात आहे. वेगवान गोलंदाज सिराजने मालिकेतील पहिली विकेट ज्या पद्धतीने घेतली, ते पाहता ही मालिका त्याच्यासाठी खास ठरणार असेच दिसते.

भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्रांतीवर असताना हार्दिक पंड्या या सामन्यात कर्णधारपद सांभाळताना दिसला. हार्दिकने सामन्याच्या सुरुवातील नाणेफेक जिंकून प्रखम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर म्हणून फलंदाजीला आले. ट्रेविस हेड अवघ्या 5 धावांवर खेळत असताना सिराजने त्याला त्रिफळाचीत केले.

मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने दुसऱ्या चेंडूत भारतासाठी ही पहिली विकेट घेतली. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सिराजने 139.6 किमी ताशी गतीने हा चेंडू टाकला. यावेळी स्ट्राईकवर ट्रेविस हेड (Travis Head) होता. चेंडू बॅटच्या आतल्या कोपऱ्यावर लागून थेट स्टंप्समध्ये घुसला. परिणामी हेड त्रिफळाचीत झाला आणि त्याला खेळपट्टी सोडावी लागली. सिराजने घेतलेली ही विकेट सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. चाहते सिराजच्या या वेगवान चेंडूचे कौतुक करत आहेत. सिराज सध्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आयसीसी रॅकिंग असणारा गोलंदाज आहे. असात येत्या काळात देखील त्याच्याकडून अशाच प्रदर्शनाच्या अपेक्षा वर्तवल्या जात आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – शुबमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, मिचले मार्श, स्टीव स्मिथ, मार्नल लाबुशेन, कॅमरून ग्रीन, जोस इंगलिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, शॉन एबॉट, मिचेल स्टार्क, एडम झंपा.
(Mohammed Siraj clean bowled Travis Head)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामना भारत-ऑस्ट्रेलियाचा पण मैफील लुटली थलायवा रजनीकांतने, वानखडेतील तो फोटो जोरदार व्हायरल
‘मी सुरेश रैना आहे, शाहिद आफ्रिदी नाही’, रैनाने का उडवली पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची खिल्ली?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---