---Advertisement---

‘एवढ्या धावा केल्या, तरीही…’, कर्णधार रोहितने ‘यांच्या’ डोक्यावर फोडले पराभवाचे खापर

On: बुधवार, सप्टेंबर 21, 2022 10:44 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर माध्यमांशी बोलत होता. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सच्या अंतराने जिंकला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 208 धावा उभ्या केल्या होत्या, परंतु तरीदेखील ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकात बाजी मारली. उभय संघातील या मालिकेत ऑस्ट्रेलिया आता 0-1 अशा आघाडीवर आहे. भारतीय कर्धणार रोहितने या सामन्यात मिळालेल्या पराभवाचे खापर पूर्णपणे गोलंदाजी विभागावर फोडले. 

सामना संपल्यानंतर रोहित माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “मला नाही वाटत आम्ही चांगली गोलंदाजी केली. 200 ही विजय मिळवण्यासाठी चांगली धावसंख्या आहे. आम्ही मैदानातील आमच्या संधीचा फायदा घेतला नाहीये. आमच्या फलंदाजांकडून खूप चागले प्रयत्न केले गेले होते, पण गोलंदाजांचे प्रयत्न परेसे नव्हते. आम्हाला या गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. पण या सामन्यात आम्ही ज्या चुका केल्या, त्या मसजू शकतात.”

“तुम्ही शेवटच्या 4 षटकांमध्ये 60 धावा वाचवायच्या असतील तर स्वतःवर विश्वास ठेवू शकता. आम्हाला वेळीच महत्वाच्या विकेट्स घेता आल्या नाहीत. जर आम्ही अजून एक विकेट घेतली असती, तर परिस्थिती वेगळी असती. तुम्हाला दरवेळी 200 धावा करता येत नसताता. खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली. हार्दिकने आम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी खरोखर चांगली फलंदाजी केली. आम्हाला पुढच्या सामन्याआधी गोलंदाजी विभागावर काम करण्याची गरज आहे,” असेही रोहित पुढे बोलताना म्हणाला.

दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक गमावल्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये भारताने 6 विकेट्सच्या नुकसानावर 208 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांना 19.2 षटकात 6 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. भारतासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याने 30 चेंडूत 71 धावांची वादळी खेळी केली आणि या प्रदर्शनासाठी रोहितकडून कौतुक देखील केले गेले.

गोलंदाजी विभागात एकटा अक्षर पटेल सोडला, तर इतर सर्वांनी अपेक्षेपेक्षा जास्त धावा खर्च केल्या. अक्षरने 4 षटकांमध्ये 17 धावा खर्च करून 3 महत्वाच्या विकेट्स घेतल्या. उमेश यादव दोन विकेट्स घेऊ शकला, पण त्याने अवघ्या 2 षटकांमध्येच तब्बल 27 धावा खर्च केल्या. युझवेंद्र चहलने शेवटच्या षटकात एक महत्वाची विकेट घेतली, पण त्याने देखील 3.2 षटकांमध्ये 42 धावा दिल्या. भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि हार्दिक पंड्या यांना एकही विकेट घेतला आली नाही. या तिघांनी अनुक्रमे 52, 49 आणि 22 अशा धावा खर्च केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताचे प्रदर्शन पाहूनच ऑस्ट्रेलियाने बनवला पुढचा प्लॅन, वादळी खेळीनंतर कॅमरून ग्रीनने दिली माहिती
ऑस्ट्रेलियाच टी20 चे किंग! 209 धावांचा पाठलाग करत चारली टीम इंडियाला धूळ; ग्रीन-वेड विजयाचे शिल्पकार 
…आणि इथेच सामना टीम इंडियाच्या हातून गेला! नक्की घडलं काय?   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---