दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या यंदाच्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी पराभव केला आहे. तर, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांमध्ये 7 बाद 253 धावा केल्या होत्या. त्यानंतर 254धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेला भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. भारताचा युवा संघ संपूर्ण 50 षटकंदेखील खेळू शकला नाही.
याबरोबरच, अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाकडून सौम्य पांडे याने इतिहास रचला आहे. तर सौम्य पांडेयाने भारतीय संघाकडून अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच सौम्य पांडे याने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज देखील ठरला आहे. तर रवी बिश्नोईला मागे टाकत सौम्य पांडे याने हा पराक्रम केला आहे.
तसेच अंतिम सामन्यात सौम्य पांडे याने एकच विकेट घेतली होती. यामध्ये सौम्यने हरजस सिंह याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सौम्यने हरजसला 55 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं होते. तर हरजस सौम्यची या वर्ल्ड कपमधील 18 वी शिकार ठरला असून त्याने यासह इतिहास रचला आहे.
सौम्यने हरजसच्या विकेटसह रवी बिश्नोईला मागे टाकत भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. तर रवी बिश्नोई याने 2020 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच आपण जाणून घेणार आहोत भारतीय संघासाठी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्या आहेत.
भारतीय संघासाठी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स
सौम्य पांडे, 18 विकेट्स, 2024
रवी बिश्नोई, 17 विकेट्स, 2020
अभिषेक शर्मा, 14 विकेट्स, 2002
कुलदीप यादव, 14 विकेट्स, 2014
अनुकूल रॉय, 14 विकेट्स, 2018
🚨 Stat Alert 🚨
History for Saumy Pandey, 18 wickets so far
🚨Most wickets taken in a single edition of U-19 WC for Team India
18* in 7 inns – Saumy Pandey, 2024
17 in 6 inns – Ravi Bishnoi, 2020
14 in 8 inns – Shalabh Srivastava, 2000🚨Most wickets taken by a spinner in a… pic.twitter.com/GebChjrsnG
— RevSportz (@RevSportz) February 11, 2024
महत्वाच्या बातम्या –
U19 WC Final । भारताचा बदला अपुराच! अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून यंग इंडियाही पराभूत