---Advertisement---

IND vs AUS: संघाला मोठा धक्का! दुसऱ्या कसोटी सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर

---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 295 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता दोन्ही संघांमधील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाईल. जो गुलाबी चेंडू कसोटी असेल. मात्र याआधी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला असून वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड या सामन्यातून बाहेर झाला आहे.

ईसपीएनक्रिकइन्फोनुसार, जोश हेझलवूडला साइड स्ट्रेनमुळे डे-नाईट टेस्ट मॅचमधून बाहेर ठेवण्यात आले असून त्याच्या जागी सीन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट यांचा ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. पण या दोघांना प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळणे अवघड आहे. कारण स्कॉट बोलँडचा संघात आधीच समावेश आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात हेझलवूडने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात एक विकेट घेतली. आता त्याच्या अनुपस्थितीमुळे संघावर मोठे संकट उभे ठाकले आहे.

 

जोश हेझलवूडने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियासाठी 71 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये त्याने एकूण 278 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 138 विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एकूण 67 विकेट्स आहेत.

भारतीय संघाबद्दल बोलायचे झाल्यास बोटाच्या दुखापतीतून परतल्यानंतर शुबमन गिल सध्या सराव सामन्यात खेळत आहे. याचा अर्थ असा आहे की, तो दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता दाट आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा उपल्बध झाल्याने दुसऱ्या कसोटीत तो संघाची धुरा सांभाळेल. अश्या परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमधून कोणाचा पत्ता कट होणाार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा-

दिल्ली संघाने टी20 मध्ये रचला इतिहास! एका सामन्यात सर्वच खेळाडूंनी केली गोलंदाजी
9 षटकार, 5 चौकार आगामी आयपीएलपूर्वीच इशान किशनची तुफानी खेळी!
ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंनी बुमराहचे एका शब्दात केले कौतुक! तर कमिन्स म्हणाला….

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---