भारतीय संघाचा सलामीवीरी फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा बुधवारी (27 सप्टेंबर) तुफान फॉर्ममध्ये दिसला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसरा वनडे सामना राजकोटवर खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्मा आणि वॉशिंटन सुंदर ही सलामीवीर जोडी पाहायला मिळाली. रोहितने पावरप्लेच्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आवले 550 षटकार देखील पूर्ण केले.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 550 षटकारांचा आकडा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे गोलंदाजी आक्रमण जगात सर्वोत्तम मानले जाते. बुधवारी (27 सप्टेंबर) भारताविरुद्ध मिचेल स्टार, जोश हेजलवूड, पॅट कमिन्स आणि कॅमरून ग्रीन हे चार वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियासाठी खेळत होते. पण कर्णधार रोहित शर्मा याने या सर्वांच्या चेंडूवर मोठे शॉट्स खेळले. रोहितने अवघ्या 31 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. (IND vs AUS Captain Rohit Sharma is dealing in sixes in Rajkot)
Triple Treat ????
A quickfire half century from Captain Rohit Sharma, who’s looking in fine touch in the chase ????#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank | @ImRo45 pic.twitter.com/zNdFvUBp3s
— BCCI (@BCCI) September 27, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारीत 50 षटकांमध्ये पाहुण्या संघाने 7 विकेट्सच्या नुकसानावर 352 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पावरप्लेच्या 10 षटकांमध्ये एका विकेटच्या नुकसानावर 90 धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलिया – मिचेल मार्श, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तन्वीर संघा, जोश हेझलवूड
महत्वाच्या बातम्या –
World Cup Countdown: वीरू-धोनीची वर्ल्डकपमध्ये फाईव्ह स्टार कामगिरी, असा आहे तो विक्रम
IND vs AUS । जसप्रीत बुमराहचा जुना फॉर्म! घातक यॉर्कर टाकून उडवला मॅक्सवेलचा त्रिफळा