---Advertisement---

दुबईमध्ये टीम इंडियाला नमवणे अशक्य! ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने रचला मोठा विक्रम

On: बुधवार, मार्च 5, 2025 11:40 AM
---Advertisement---

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. (India vs Australia Semifinal 2025) प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकांत 264 धावांवर आटोपला. अशाप्रकारे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर 265 धावांचे लक्ष्य होते. जे भारताने 48.1 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. (India enters Champions Trophy Final)

या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच, भारतीय संघाने एक मोठा विक्रम केला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताचा हा सलग नववा विजय आहे. तर, भारताचा एक सामना बरोबरीत सुटला. गेल्या 10 सामन्यांमध्ये, दुबईमध्ये विरोधी संघाला भारताला हरवण्यात अपयश आले आहे. (Team india’s Record At Dubai cricket Stadium)

एका मैदानावर सर्वाधिक सलग एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंडने ड्युनेडिनमध्ये सलग 10 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम रचला आहे. पण आता भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकण्यात यशस्वी झाला तर तो न्यूझीलंडच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करेल. खरं तर, आतापर्यंत भारताने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सलग 9 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, भारत या यादीत पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारताने सलग 7 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम रचला आहे. तर पाकिस्तानने हैदराबाद (पाकिस्तान) च्या मैदानावर सलग 7 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. (India’s winning streak in Dubai)

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव केला. अशाप्रकारे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 49.3 षटकांत 264 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 73 धावा केल्या. तर अ‍ॅलेक्स कॅरीने 61 धावांचे योगदान दिले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांना 2-2 यश मिळाले. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

264 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारताने 48.1 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 84 धावा केल्या. याशिवाय श्रेयस अय्यरने 45 धावांचे योगदान दिले. तर केएल राहुल 42 धावा करून नाबाद परतला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि अ‍ॅडम झम्पा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

हेही वाचा-

रोहित शर्माच्या कामगिरीवर गौतम गंभीरची स्पष्ट भूमिका! म्हणाला, ‘आकडेवारीपेक्षा विजय महत्त्वाचा….
रोहित शर्माचा ऐतिहासिक विश्वविक्रम, असा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव कर्णधार!
‘चेस मास्टर’ विराट कोहलीचा जलवा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 विक्रम रचत इतिहास घडवला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---