भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील खेळवल्या जाणाऱ्या बाॅर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा चमकदार गोलंदाजी केली आहे. एकीकडे सर्व भारतीय गोलंदाज फ्लाॅप ठरत असताना बुमराहने आपल्यातले काैशल्य दाखवत कांगारु संघाच्या फलंदाजांना माघारी पाठवले आहे. या सामन्यात बुमराहने या बातमी आखेरीस 25 षकात 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याव्यतीरिक्त नवख्या नितीश कुमार रेड्डीने एक विकेट मिळवले आहे. या दोघांव्यतीरिक्त इतर कोणत्याही गोलंदाजाला आपली छाप सोडता आलेली नाही.
भारतीय संघाचा संकमोचक जसप्रीत बुमराहने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नव्या चेंडूने बुमराहला खेळणे म्हणजे आग्निपरिक्षा असल्याचे दिसत आहे. सामन्याच्या पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. दोघेही उस्मान ख्वाजा (21) नॅथन मॅकस्विनी (9) धावा करुन बाद झाले. यानंतर मार्नस लाबुशेन देखील स्वस्तात बाद झाला. त्याला नितीश कुमार रेड्डीने बाद केले. यानंतर मात्र ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संघाला सावरले. त्यांनी 200+ धावांची भागिदारी करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले.
Another day, another five-wicket haul for Jasprit Bumrah 🌟#WTC25 | #AUSvIND pic.twitter.com/WkOZHoxpRL
— ICC (@ICC) December 15, 2024
यानंतर तिसऱ्या सत्रात नव्या चेंडूने गोलंदाजी करायला येताच जसप्रीत बुमराहने पुन्हा आपली छाप सोडली. त्याने आक्रमकपणे खेळत असलेल्या स्टीव्ह स्मिथ (101) तंबूत पाठवले. स्मिथच्या विकेट नंतर बुमराहने हेड (152) आणि मिचेल मार्शला (5) झटपट बाद केले. आशाप्रकारे जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकलेल्या सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडियाचे सामन्यात कमबॅक केले. या बातमीआखेरीस ऑस्ट्रेलियन संघ 92 षटकात 352-6 अश्या स्थितीत आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराहने आतापर्यंत एकूण सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच या पाच विकेट हाॅलच्या मदतीने त्याने आतापर्यंत 12 वेळा अशी कामगिरी केला आहे.
सेना (SENA) देशांमध्ये भारतासाठी सर्वाधिक वेळा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 विकेट घेणारे गोलंदाज
जसप्रीत बुमराह – 8 वेळा
कपिल देव – 7 वेळा
झहीर खान – 6 वेळा
भागवत चंद्रशेखर – 6 वेळा
या कामगिरीमुळे जसप्रीत बुमराहने दिग्गज कपिल देव यांना मागे टाकले आहे. तो आता सेना देशांमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट हाॅल घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत आठ वेळा 5 विकेट हाॅल घेतल्या आहेत.
हेही वाचा-
स्टीव्ह स्मिथचा कमबॅक, तब्बल इतक्या दिवसांनंतर ठोकलं कसोटी शतक!
IND VS AUS; ट्रॅव्हिस हेडचं सलग दुसरं शतक, भारतीय गोलंदाज हतबल, टीम इंडिया बॅकफूटवर
रिषभ पंतचा गाबा कसोटीत ऐतिहासिक विक्रम, अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा भारतीय यष्टीरक्षक