पर्थ कसोटीत टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणारा भारतीय वेगवान गोलंदाज आणि कर्णधार जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एक नवा विक्रम रचला आहे. पर्थ कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी बुमराहने ॲलेक्स कॅरीची शिकार करून दिग्गज गोलंदाजांना मागे सोडले. पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांत गारद झाला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 गडी गमावून 67 धावा केल्या होत्या.
पहिल्याच दिवशी बुमराहने 4 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ उडवून दिली. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. बुमराहने कसोटी सामन्यात 5 विकेट घेत खळबळ उडवून दिली आहे. कसोटी क्रिकेटमधील त्याची ही 11वी 5 विकेट आहे. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर दुसऱ्यांदा कसोटी सामन्याच्या एका डावात अर्धा संघ बाद करण्याचा मोठा पराक्रम त्याने केला आहे. याआधी बुमराहने डिसेंबर 2018 मध्ये मेलबर्न कसोटी सामन्याच्या एका डावात 6 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
5⃣-wicket haul! ✅
Jasprit Bumrah’s 11th in Test cricket ???? ????
A cracking start to the morning for #TeamIndia on Day 2 ???? ????
Live ▶️ https://t.co/gTqS3UPruo#AUSvIND pic.twitter.com/1YNs653kiX
— BCCI (@BCCI) November 23, 2024
या 5 विकेट्समुळे बुमराहने आता कपिल देवच्या महान विक्रमाची बरोबरी केली आहे. सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सर्वाधिक 5 बळी घेण्याच्या बाबतीत बुमराह आता कपिल देवच्या बरोबरीने पोहोचला आहे. दोन्ही गोलंदाजांनी SENA देशांमध्ये 7 वेळा 5 बळी घेतले आहेत.
सेना (SENA) देशांमध्ये सर्वाधिक 5 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज
7 वेळा – जसप्रीत बुमराह (51 डाव)*
7 वेळा – कपिल देव (62 डाव)
हेही वाचा-
SMAT 2024; अभिषेक शर्मापासून मोहम्मद शमीपर्यंत स्टार खेळाडू ॲक्शनमध्ये, या ठिकाणी पाहा लाईव्ह सामना
जॉश हेझलवुडने चक्क इतक्यावेळा विराट कोहलीला बाद केले, किंगचा लाजिरवाणा रेकाॅर्ड!
आयसीसी स्पर्धा भारत-पाकिस्तानमध्ये होऊ नयेत, माजी कर्णधाराचे मोठे वक्तव्य!






