भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ज्यामध्ये संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील पुढचा चाैथा सामना मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरला होणार आहे. टीम इंडियाला विजयासह आघाडी घ्यायला आवडेल, पण त्यांच्यासाठी हे सोपे काम असणार नाही. या सगळ्या दरम्यान भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलला चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी दुखापत झाली आहे. जी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यापूर्वी टीम इंडिया मेलबर्नमध्ये सराव करत आहे. सराव सत्रादरम्यान नेटमध्ये फलंदाजी करत असताना त्याच्या हातात चेंडू लागला. त्यानंतर टीम इंडियाच्या फिजिओने त्याच्यावर उपचार केले. सराव करताना त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. यानंतर तो खूपच अस्वस्थ दिसत होता. त्यानंतर तो फिजिओची मदत मागताना दिसला. त्याच्या दुखापतीबाबत संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयकडून कोणतीही विशेष माहिती देण्यात आलेली नाही. मात्र ही दुखापत मोठी असेल आणि केएल राहुल चौथ्या सामन्याला मुकला तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल.
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये राहुल उपचारादरम्यान उजवा हात धरलेला दिसत आहे. राहुल सध्याच्या दौऱ्यात फॉर्मात आहे. त्याने सहा डावात 47 च्या सरासरीने 235 धावा केल्या आहेत. राहुलने आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली असून तिसऱ्या सामन्यात त्याने 84 धावांची शानदार खेळी केली. त्या सामन्यात त्याला शतक झळकावता आले नाही, पण त्याच्या खेळीमुळे टीम इंडिया त्या सामन्यात फॉलोऑनपासून वाचली आणि भारतीय संघ तो सामना अनिर्णित राखू शकला.
हेही वाचा-
IND vs AUS; “ट्रेविस हेडला रोखणे कठीण…” भारताच्या माजी प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य
Vijay Hazare Trophy; दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ खेळाडूची तुफानी खेळी, ठोकल्या नाबाद 170 धावा
चॅम्पियन्स ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर! भारत कधी आणि कुठे खेळणार सामने?