इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वाॅन सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. यापूर्वी त्याने भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ०-४ अशा फरकाने हरेल, असे भाकीत केले होते. भारतीय संघ पहिला कसोटी सामना हरल्यानंतर देखील त्याने ट्विट करत आपल्या या भाकिताची आठवण करून दिली होती. मात्र भारताने दुसरा सामना जिंकल्यामुळे सोशल मिडीयावर या भाकितासाठीच लोकांनी त्याला ट्रोल केले होते.
मात्र आता नुकेतेच त्याने असेच नवीन वादग्रस्त विधान केले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना ब्रिस्बेन येथे आयोजित करण्यात आला आहे. मात्र तेथील विलगीकरणाच्या सक्त नियमांमुळे भारतीय संघ तिथे सामना खेळण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे. तसेच हा सामना इतरत्र हलविण्याची विनंती देखील बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला केल्याचे समजते.
परंतु, भारतीय संघ पराभवाच्या भीतीमुळे ब्रिस्बेनचा सामना टाळत असल्याचा आरोप मायकेल वाॅनने केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट करत त्याने हे विधान केले आहे. या पोस्टमध्ये तो म्हणाला, “भारतीय संघ ब्रिस्बेनमधील सामना नक्की का टाळत आहे? कोरोना प्रतिबंधक नियमांच्या भीतीने की खेळपट्टीच्या भीतीने?”
Covid restrictions or the Pitch in Brisbane they are concerned about ? https://t.co/5sfB1rQhfR
— Michael Vaughan (@MichaelVaughan) January 6, 2021
दरम्यान ब्रिस्बेनमधील आकडेवारी भारतीय संघासाठी नक्कीच चिंताजनक आहे. येथे खेळलेल्या सहा पैकी पाच सामन्यात भारताला पराभवाची चव चाखावी लागली आहे. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाच्या मते ब्रिस्बेनमधील कोरोना प्रतिबंधक नियम अधिक कठोर आहेत. त्यामुळे खेळाडू देखील फार काळ तेथे विलगीकरणात राहण्यास उत्सुक नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या नवदीप सैनीने सिडनीत कसोटी पदार्पण केले, त्याच्यासाठी एकवेळ भांडला होता गंभीर
… म्हणून ट्रॅविस हेडला संघात स्थान नाही, कर्णधार टीम पेनची स्पष्टोक्ती
“विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अतिशय अवघड”