ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यांनंतर ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजावर टीका केली जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या फलंदाजीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु पॅट कमिन्स म्हणाला, “आम्हाला फलंदाजी बद्दल चिंता नाही.”
ऑस्ट्रेलिया संघाचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरत आहेत. यामध्ये स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने यांची फलंदाजी खराब झाली आहे. स्टीव्ह स्मिथ दोन्ही सामन्यात मोठी खेळी करण्यात यशस्वी झाला नाही. त्याने दोन कसोटी सामन्यात चार सामन्यात फलंदाजी करताना 1, 1*, 0 आणि 8 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर मार्नस लाब्यूशानने या चार डावात 47, 6 , 48 आणि 28 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स बुधवारी म्हणाला की स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने यांच्या फलंदाजीबद्दल आम्हाला चिंता नाही. उर्वरित दोन सामन्यात भारता विरुद्ध हे दोघे मोठी खेळी करतील.
पॅट कमिन्स आभासी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला, “आम्ही सर्वांनी एवढे मोठे मापदंड निर्माण केले आहेत की सगळ्यांना वाटते की प्रत्येक सामन्यात हे मोठी धावसंख्या उभी करतील. खरंतर आता पर्यंत फक्त दोन सामने झाले आहेत. स्मिथ आणि मार्नस दोघे मोठी खेळी करतात. स्मिथ 10-11 वर्षापासून चॅम्पियन फलंदाज आहे, त्यामुळे कोणता दबाव नाही. प्रत्येक खेळाडू चढ उतारातून जात असतो आणि पुनरागमन करतो. आम्ही कोणत्याही दबावात नाही. ”
ऑस्ट्रेलिया संघाने आता पर्यंत दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. परंतु एॅडलेडमध्ये 191 धावसंख्या उभा करून सुद्धा ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या सामन्यात 195 आणि 200 धावसंख्या उभारली होती. ज्यामधे भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला.
पॅट कमिन्सने मान्य केले की काही विभागात ऑस्ट्रेलिया संघाला सुधारणा करण्याची गरज आहे. परंतु फलंदाजावर विश्वास दाखवताना म्हणाला की ते नक्की पुनरागमन करतील. तो म्हणाला, “आता फक्त दोन सामने आणि तीन डाव झाले. त्यामुळे इतक्या लवकर बदल करण्याची मागणी योग्य नाही. मात्र आम्हाला काही विभागात सुधारणा करण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की आमचे फलंदाज पुनरागमन करतील.”
महत्वाच्या बातम्या:
– ब्रेकिंग: भीषण अपघातातून बालंबाल बचावले मोहम्मद अझरुद्दीन, गाडीचा झाला चक्काचूर
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय