भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला. तब्बल 8व्यांदा हा चषक जिंकण्याची कामगिरी भारताने करून दाखवली. आता भारताने विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. या स्पर्धेपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणाही झाली आहे. यातील पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहली याला विश्रांती दिली गेली आहे. तसेच, तिसऱ्या सामन्यात तो पुनरागमन करेल.
भारतीय क्रिकेटप्रेमींच्या नजरा विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर असतील. कारण, विराट त्या खेळाडूंमध्ये सामील आहे, जो सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या 100 शतकांचा विक्रम (100 Centuries Record) मोडू शकतात.
अशातच भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी विराट कोहली याच्याविषयी हैराण करणारे भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विराट कोहलीसाठी सचिन तेंडुलकरच्या 51 कसोटी शतकांपर्यंत पोहोचणे कठीण होईल.
मांजरेकरांचे भाष्य
मांजरेकर म्हणाले की, “सचिन तेंडुलकरच्या नावावर 51 कसोटी शतके आहेत, जे सुनील गावसकर यांच्या तुलनेत 17 शतके जास्त आहेत. एका चांगल्या खेळाडूसाठी वनडेत धावा करणे कसोटीच्या तुलनेत सोपे असते. कारण, गोलंदाज नेहमी विकेट घेण्याचा प्रयत्न करतो. सचिन आणि विराट यासाठी खास आहेत, कारण त्यांच्या नावावर कसोटीत बरीच शतके आहेत. मात्र, मला वाटते की, विराटसाठी 51 कसोटी शतकांपर्यंत पोहोचणे खूपच कठीण ठरेल.”
एका युट्यूब चॅनेलशी बोलताना त्यांनी असेही म्हटले की, “विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यात एक समानताही आहे. ती अशी की, दोघेही मनापासून क्रिकेट खेळतात. त्यांना नेहमीच मैदानावर राहायचे असते. आशिया चषकाच्या सुपर- 4 फेरीच्या अखेरच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध विराट संघाचा भाग नव्हता. मात्र, तरीही तो मैदानावर होता. मला वाटत नाही की, विराटला ताकद किंवा नेतृत्व करण्याची इच्छा आहे.”
सचिनची सर्वाधिक कसोटी शतके
खरं तर, महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर कसोटीत 51 शतकांचा विक्रम आहे. तसेच, विराटने आतापर्यंत 29 कसोटी शतके केली आहेत. दोघांनी कसोटीत जास्त शतके केल्यामुळे त्यांची नेहमीच तुलना होते. (ind vs aus sanjay manjrekar said it is difficult for cricketer virat kohli to reach sachin tendulkar 51 test centuries record)
हेही वाचाच-
World Cupमध्ये सर्वाधिक Catch पकडण्याचा रेकॉर्ड ‘या’ दिग्गजाच्या नावे, विराटसाठी चालून आली सुवर्णसंधी
शाहीन दुसऱ्यांदा बनला आफ्रिदीचा जावई, बाबरने कडकडीत मिठी मारून दिल्या शुभेच्छा- Video