भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा दुसरा टी२० सामना सिडनीच्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी घेतली आहे. या सामन्यात विजय मिळवून, मालिकाविजय साजरा करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणाऱ्या यष्टीरक्षक मॅथ्यू वेड याने वेगवान अर्धशतक झळकावत आठ वर्षांपूर्वीच्या आपल्याच एका कारनाम्याची पुनरावृत्ती केली.
वेड करतोय ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व
भारताविरुद्धच्या दुसर्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व यष्टीरक्षक मॅथ्यू वेड करतोय. नियमित कर्णधार ऍरॉन फिंचच्या जागी त्याला संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. या सामन्यात फिंच दुखापतीमुळे खेळू शकणार नव्हता. अशा परिस्थितीत माजी कर्णधार स्टीव स्मिथ संघात असूनही मॅथ्यू वेडला कर्णधार बनवण्यात आले.
सलामीला येत केली तुफान फटकेबाजी
मॅथ्यू वेडने भारताविरुद्ध सलामीला येऊन पहिल्या गड्यासाठी डार्सी शॉर्टबरोबर ४७ धावांची चांगली भागीदारी केली. वेडने ३२ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि एक षटकार देखील ठोकला. या खेळी दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १८१.२५ असा जबरदस्त होता.
अर्धशतकासह केली विशेष कामगिरी
या अर्धशतकासह वेडने एक विशेष कामगिरी केली. टी२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक म्हणून खेळताना त्याने दुसरे अर्धशतक झळकावले. याआधी, २०१२ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक म्हणून टी२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावले होते. आता ८ वर्षांनंतर त्याने पुन्हा यष्टीरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात अर्धशतक झळकावणारा मॅथ्यू वेड पहिला ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाज आहे .
ऑस्ट्रेलियन संघाने उभारला धावांचा डोंगर
वेड ५८ धावांवर बाद झाला पण संघातील इतर फलंदाजांनी २० षटकांत ५ बाद १९४ अशी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथने ४४, तर ग्लेन मॅक्सवेलने १३ चेंडूत २२ धावा केल्या. याव्यतिरिक्त मोझेस हेन्रीक्सने १८ चेंडूत वेगवान २६ धावा केल्या. भारतीय संघाचा सामना आणि मालिका जिंकायची असेल, तर १९५ धावांचे आव्हान पूर्ण करावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
नादच खुळा! भुवी अन् अश्विनला मागे टाकत चहलच्या नावावर खास विक्रमाची नोंद
VIDEO : ‘कन्कशन सब्टीट्यूट’ म्हणून चहलची निवड केल्याबद्दल थेट सामना रेफरीशी भिडले लँगर
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर