Ind vs Aus U19 WC Final : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना हा दक्षिण अफ्रिकेतील बेनोनी येथील विलोमूरे पार्क मैदानात चालू आहे. तर या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने दक्षिण अफ्रिकेचा, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानाचा पराभव केला आहे. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने अतितटीचे राहिले. त्यामुळे अंतिम फेरीचा सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळू शकते.
याबरोबरच, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 7 बाद 253 धावा करत भारतासमोर मोठे आव्हान ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून हरजास सिंगने सर्वाधिक 55 धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाकडून राज लिंबानीयाने ३ फलंदाजांना बाद केले आहे.
अशातच भारतीय संघाला अंडर 19 वर्ल्डकपचा षटकार लावाण्यासाठी चांगली संधी निर्णाण झाली आहे. याबरोबरच वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत झाली होती. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे कोट्यवधी भारतीय क्रीडाप्रेमींचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे त्या पराभवाची कसर अंडर 19 वर्ल्डकप काढण्याची संधी असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.
दरम्यान, भारतीय संघाने साखळी फेरीत बांगलादेश, आयर्लंड, नेपाळ या संघांना पराभूत केलं. तर सुपर सिक्समध्ये युएसए आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे विलोमूरेची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीवर बरंच काही अवलंबून असणार आहे.
अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ :-
भारतीय संघ :- आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे.
ऑस्ट्रेलिया संघ :- ऑस्ट्रेलिया: हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (यष्टीरक्षक), ऑलिव्हर पीक, चार्ली अँडरसन, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन, कॅलम विडलर.
महत्वाच्या बातम्या –
Gautam Gambhir : गौतम गंभीरवर कोसळला दुःखाचा डोंगर, कुटुंबातील सदस्याचे झाले निधन…
ओळखा पाहू! IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सच्या खेळाडूने केला 90 च्या दशकातील अनोखा लुक…