वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात दोन्ही तुल्यबळ संघ आमने सामने होते. भारत आणि ऑस्ट्रेलियातील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला. 241 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाला या सामन्यात सुरुवातीच्या तीन विकेट्स स्वस्तात गमवाव्या लागल्या. स्टीव स्मिथ याने आपली विकेट स्वतच्या चुकीने गमावली, असे म्हणता येईल.
भारतीय संघाने वनडे विश्वचषकाच्या अंतिम नाणेफेक गमावल्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारीत 50 षटकांमध्ये भारतीय संघ 240 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात 241 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचे पहिले तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. स्टीव स्मिथ याच्या रुपात ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका बसला. स्मिथने डावातील सातव्या षटकात जसप्रीत बुमराह याच्या चेंडूवर पायचीत झाला.
जसप्रीत बुमराहच्या षठकातील शेवटचा चेंडूक स्मिथच्या पॅडला लागला. हे पाहून वेगवान गोलंदाज बुमराहसह सर्व भारतीय संघ पंचांकडे विकेटसाटी अपील करू लागले. भारतीय खेळाडू आणि बुमराहचा पूर्ण आत्मविस्वाने अपली करत होते. पंचांनी देखील स्मिथला बाद दिले. मैदानातील हा प्रकार अवघ्या काही क्षणांमध्ये झाल्यानंतर स्मिथलाही तो बाद असल्याचा भास झाला आणि त्याने खेळपट्टी सोडली. स्मिथने खेळपट्टी सोडण्याआधी डीआरएस घेण्याबाबत एकदा विचार केला, पण नॉन स्ट्राईकवरील फलंदाजाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद न आल्याने त्याने विकेट सोडली. पण स्मिथ मैदानाबाहेर गेल्यानंतर रिव्ह्यूमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद नसल्याचे दिसून आले. बुमराहने टाकलेला चेंडू लेग स्टंप्सच्याही बाहेर होता. पण दबावाच्या परिस्थितीत पंचांचा निर्णय चुकला आणि स्मिथच्या रुपात ऑस्ट्रेलियाने महत्वाची विकेट गमावली.
It was not out, but Steven Smith didn’t review. pic.twitter.com/pyKbs1BZ5i
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 19, 2023
(IND vs AUS WC Final Steven Smith was not out, but he didn’t review.)
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड (World Cup 2023 IND vs AUS final Toss See playing XI Here)
महत्वाच्या बातम्या –
बुमराहमुळे चाहत्यांना आठवली 2003 वर्ल्डकप फायनल, वेगवान गोलंदाजाची आकडेवारी चिंता वाढवणारी
IND vs AUS Final: शमीचा जलवा सुरू! भारताला दुसऱ्याच ओव्हरमध्ये यश, वॉर्नर स्वस्तात तंबूत