वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला मिळालेला पराभव अनेकांना अजूनही मान्य होत नाहीये. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने मात दिली, हेच अंतिम सत्य आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यासाठी हा शेवटचा वनडे विश्वचषक ठरू सकतो. पण संघाला विजेतेपद मिळवता आले नाही. असे असले तरी, विराटला अंतिम सामन्यानंतर खास सन्मान मिळाला.
भारतीय संघ (Team India) अंतिम सामन्यात पराभूत झाला. पण तरीरी मालिकावीर पुरस्कार भारतीय दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) यालाच मिळाला. विरानटे यार्षीच्या वनडे विश्वचषकात सर्वाधिक 765 धावा केल्या. यादरम्यानच्या 11 डावांमध्ये त्याने तीन शतक आणि 6 अर्धशतके केली. 95.63च्या सरासरीने त्याने या धावा केल्या. एका विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराटने पहिला क्रमांक देखील पटकावला आहे. 2003 विश्वचषकात सचिन तेंडुलकर याने केलेली विक्रम धावसंख्या विराटच्या प्रदर्शनापुढे फिकी पडली. विराटला या हंगामातील प्रदर्शनासाठी रविवारी अंतिम सामन्यात पराभव मिळाल्यानंतर मालिकावीर पुरस्कार दिला गेला.
Virat Kohli with the Player of the tournament award in World Cup 2023. ????????
– The GOAT. ???? pic.twitter.com/UY4efOfsUQ
— Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2023
दरम्यान, अंतिम सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. 50 षटकात 240 धावा करून भारतीय संग सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 43 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर जिंकला. ट्रेविस हेड सामनावीर ठरला, ज्याने 120 चेंडूत 137 धावांची वादळी खेळी केली. मोहम्मद सिराज संपूर्ण हंगामात भारतासाठी मॅच विनर ठरला, पण अंतिम सामन्यात शमीची जादुही चालली नाही. जसप्रीत बुमारह याने भारतासाठी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तसेच दुसरीकडे मिचेल स्टार्क पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा सर्वात महत्वाचा गोलंदाज ठरला. उपांत्य सामन्यानंतर अंतिम सामन्यातही स्टार्कने तीन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. (IND vs AUS World Cup Final Player of the tournament award goes to Virat Kohli in World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
काळीज तोडणारा पराभव! स्वप्न तुटताच Emotional झाले विराट-राहुल; दोघांच्या पत्नींची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद
धक्कादायक! दारुण पराभवासाठी गावसकरांनी ‘या’ दोघांना धरलं जबाबदार; सांगूनच टाकलं, नेमकी कुठं झाली चूक