भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. भारताने पहिली कसोटी सहज जिंकली. मात्र पावसामुळे दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (28 सप्टेंबर) कोणताही खेळ झाला नाही. पहिल्या दिवशी देखील एकाच सत्राचा खेळ झाला होता. मात्र, तिसऱ्या दिवशी खेळ सुरू होऊ शकतो. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने या मालिकेत चांगलीच छाप पाडली आहे. आकाश दीपसाठी शमी एक चांगला आदर्श ठरू शकतो, असे झहीर खानने म्हटले आहे.
झहीर म्हणाला, “जेव्हा तुम्ही स्टंपवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करता आणि चांगली लेंथ टाकता. लेंथचा चेंडू तुम्हाला मदत करतो. अशाच प्रकारे शमीने आपले यश संपादन केले आहे. जर आकाश दीपला आदर्श हवा असेल तर शमीपेक्षा चांगला कोणीच असू शकत नाही. त्याच्या सीम पोझिशनची नेहमीच चर्चा होते. आकाश दीपकडे सातत्य आहे. मात्र, इतर गोलंदाजांशी बोलल्यास तो आपल्या गोलंदाजीत वैविध्य आणू शकतो.”
दरम्यान, शमी दुखापतीतून सावरत असून, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि बॉर्डर-गावसकर मालिकेत तो पुनरागमन करू शकतो, असे मानले जात आहे. कानपूरमध्ये सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आकाश दीपने पहिल्या दिवशी दोन विकेट्स घेतल्या. बंगालच्या या वेगवान गोलंदाजाने या वर्षाच्या सुरुवातीला रांचीमध्ये इंग्लंडविरुद्ध चांगली सुरुवात केली होती. जिथे त्याने पहिल्या डावात तीन विकेट घेतल्या होत्या.
आकाश दीपने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. आत्तापर्यंत त्याने भारतासाठी एकूण 2 कसोटी सामने खेळले आहेत. 3 डावात गोलंदाजी करताना त्याने एकूण 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. सध्या भारतीय कसोटी संघात जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्यानंतर तो तिसरा प्रमुख गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो भारतीय संघाचा भाग असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
5 क्रिकेटपटू ज्यांनी कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली, नंतर फलंदाजीत कमावलं नाव
कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ, तब्बल 9 वर्षांनंतर भारतात असं घडलं
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत केन विल्यमसनच्या नावे नकोसा विक्रम! काय घडलं जाणून घ्या