Hardik Pandya Injury: भारत विरुद्ध बांगलादेश संघात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 17वा सामना खेळला जात आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर हा सामना पार पडत आहे. या सामन्यात बांगलादेश संघाचा प्रभारी कर्णधार नजमुल होसेन शांतो याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार शाकिब अल हसन खेळत नसल्यामुळे त्याच्या जागी शांतोच्या खांद्यावर संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. अशात सामना सुरू असतानाच भारतासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे.
खरं तर, बांगलादेशच्या डावातील 10व्या षटकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. डावातील 9वे षटक टाकण्यासाठी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आला होता. यावेळी त्याने पहिले तीन चेंडू टाकले. मात्र, तिसऱ्या चेंडूवर लिटन दासने फटका मारला. हा चेंडू अडवताना पंड्या दुखापतग्रस्त झाला. त्याच्या पायाला दुखापत झाली. यानंतर तातडीने फिजिओ मैदानावर आले. मात्र, पंड्याची दुखापत लगेच बरी झाली नाही.
Hardik Pandya going off…!!!
– Hoping he is alright soon. pic.twitter.com/OaD2E8dz2Q
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2023
पंड्या दुखापतग्रस्त, मैदानातून बाहेर
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात प्रथम फलंदाजी करातना बांगलादेशने शानदार सुरुवात केली. मात्र, बांगलादेशच्या डावातील 9व्या षटकात आपल्याच चेंडूवर पंड्या दुखापतग्रस्त झाला. चौकार पायाने रोखण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय मुरगळला आणि तो जमिनीवर पडला. यानंतर फिजिओचे पथक मैदानावर आले. यावेळी त्यांनी पंड्याच्या पायावर चिकट टेपही लावला. विशेष म्हणजे, पंड्याने गोलंदाजी टाकण्याचा सराव केला, पण त्यानेही काही फरक पडला नाही. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने त्याला मैदानाबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला.
Hardik Pandya Twist Ankle Out From Ground #INDvsBAN #HardikPandya #ViratKohli pic.twitter.com/2X1Wunjqft
— Priyanka Joshi (@Priyank79476502) October 19, 2023
विराटने केली गोलंदाजी
पंड्या 9व्या षटकातील फक्त 3 चेंडू टाकून मैदानाबाहेर गेला. अशात या षटकातील उर्वरित 3 चेंडू टाकण्याची जबाबदारी विराट कोहली याच्यावर सोपवण्यात आली. विराटने यावेळी उर्वरित 3 चेंडू टाकले. यातील एक चेंडू निर्धाव होता, तर दोन चेंडूंवर त्याने दोन धावा खर्च केल्या. (ind vs ban all rounder hardik pandya got twisted ankle injury on field during fielding against bangladesh )
हेही वाचा-
‘आमच्यावेळचा पाकिस्तान संघ वेगळा होता, आताचा…’, बाबरसेनेविषयी ‘दादा’चं रोखठोक वक्तव्य
IND vs BAN: बांगलादेशने जिंकला टॉस, टीम इंडिया विजयी ‘चौकार’ मारण्यासाठी सज्ज; पाहा Playing XI