बांग्लादेशला कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर आता टीम इंडियाला टी20 मालिकेतही क्लीन स्वीप करायचा आहे. सूर्यकुमार आणि कंपनीने बंगाली टायगर्सचा पहिल्या दोन टी20 सामन्यात पराभव केला होता आणि आता तिसरा टी20 सामना आज (12 ऑक्टोबर) हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत आज टीम इंडियाला बांग्लादेशचा पराभव करून टी20 मालिका 3-0 ने जिंकायची आहे. मात्र तिसऱ्या टी20 मध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल होऊ शकतात.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाने ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला. यानंतर दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाने बांग्लादेशचा 86 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघाने घरच्या मैदानावर सलग सातवी टी20 मालिका जिंकली. आता सूर्या आणि आर्मीला तिसऱ्या टी20 मध्येही विजयाची नोंद करायची आहे.
टीम इंडियाने आधीच मालिका जिंकली आहे. अशा स्थितीत बेंचवर बसलेल्या काही खेळाडूंना तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या मालिकेत तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि जितेश शर्मा यांना संधी मिळालेली नाही. मात्र तिसऱ्या टी20 मध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ शकतात.
स्पीड स्टार मयंक यादवला ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी2मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मयंक दुसऱ्या टी20 मध्येही खेळला. आता युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला तिसऱ्या टी20 मध्ये संधी मिळणार की नाही हे पाहायचे आहे. हर्षित आयपीएल 2024 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची वाट पाहत आहे.
तिसऱ्या टी20 मध्ये भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या/तिलक वर्मा, रियान पराग/जितेश शर्मा, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, मयंक यादव राणा आणि अर्शदीप सिंग
हेही वाचा-
मोहम्मद शमी टीम इंडियात कधी परतणार? न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही स्थान नाही
ind vs ban; तिसऱ्या टी20 मध्ये पावसाचं सावट? सामन्यापूर्वी पाहा हैदराबादचा हवामान अंदाज
कसे असणार भारतीय संघाचे पुढचे ‘मास्टर प्लॅन’? प्रशिक्षकाने स्पष्टच सांगितले