टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ बुधवारी (2 नोव्हेंबर) बांगलादेशविरुद्ध त्यांचा चौथा सामना खेळेल. भारताने पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि संघ ग्रुप दोनच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने जिंकला, तर भारताचे उपांत्य सामन्यातील तिकिट पक्के होऊ शकते. बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाची आकडेवारी तशी पाहिली, तर चांगली राहिली आहे. पण यावेळी त्यांचा कर्णधार शाकिब अल हसन याने भारताला आधीच चेतावणी देऊन बसला आहे.
बांगलादेशचे आव्हान भारतीय संघासाठी सोपे वाटत असले, तरी बांगलादेश देखील हा सामना जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न करेल. त्यांचा कर्णदार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने भारताविरुद्ध मैदानात उतरण्याआधी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शाकिबच्या मते भारतीय संघ टी-20 विश्वचषकात विजेतेपद जिंकण्याचा विचार करून याठिकाणी आला आहे. परंतु बांगलादेश मात्र विजेतेपदाचा विचार करत नाहीये. भारताविरुद्ध जर बांगलादेशने विजय मिळवला, तर टी-20 विश्वचषकातील पुढचे चित्र देखील पूर्णपणे बदलू शकते.
माध्यमांसी बोलताना शाकिब म्हणाला की, “भारत विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार आहे. ते जेतेपद जिंकण्यासाठीच याठिकाणी आले आहेत. आम्ही जर त्यांना पराभूत केले, तर हा भारतीय संघासाठी मोठा झटका असेल आणि आम्ही मोठा फेरबदल देखील घडवून आणण्याचा प्रयत्न करू. टी-20 विश्वचषकाचे दावेदार म्हणून आम्ही हा सामना खेळणार नाही.” दरम्यान, भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ विश्वचषकाता आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत आणि त्याताली दोन-दोन सामने प्रत्येक संघाने जिंकले आहेत. नेट रन रेटच्या बाबतीत मात्र भारत बांगलादेशपेक्षा सरस असल्यामुळे गुणतालिकेत त्यांच्या पुढे आहे. बांगलादेश सध्या तिसऱ्या क्रमांकावर असला, तरी भारताविरुद्ध जर त्यांनी विजय मिळवला, तर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसेल.
या खेळाडूंमधून निवडली जाणार प्लेइंग इलेव्हन –
भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर.
बांग्लादेश: शाकिब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन, अफीफ हुसैन, इबादत हुसैन, हसन महमूद, लिटन दास, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, नजमुल हुसैन शंतो, शोरिफुल इस्लाम, सौम्य सरकार, मोसादिक हुसैन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, यासिर अली चौधरी.
राखीव खेळाडू: मोहम्मद सैफुद्दीन, महेदी हसन, रिशाद हुसैन, सब्बीर रहमान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे काय हे, बांगलादेशविरुद्धही राहुलच करणार ओपनिंग! हेड कोच द्रविडने सांगितले त्यामागचे कारण
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’