---Advertisement---

दुसऱ्या वनडे सामन्याची वेळ बदलली! भारत-इंग्लंड लढत किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

On: गुरूवार, जुलै 16, 2026 8:50 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड IND VS ENG यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय ODI मालिकेतील दुसरा सामना आज (16 जुलै) कार्डिफमधील सोफिया गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. पहिला सामना जिंकल्याने, शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. दुसरीकडे, हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ मालिका बरोबरीत आणण्याच्या इराद्याने खेळेल.

विशेष म्हणजे, पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे हा सामना दुपारी 3.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होणार नाही. त्यामुळे, सामना पाहण्यापूर्वी त्याची वेळ आणि प्रसारणाबाबतची माहिती जाणून घेऊया…

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना कधी आणि कुठे होणार आहे?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज, गुरुवारी (16 जुलै) वेल्समधील कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल.

सामना किती वाजता सुरू होईल?

स्थानिक वेळेनुसार हा सामना दुपारी 1 वाजता सुरू होईल. भारतीय वेळेनुसार, सामना सायंकाळी 5.30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक (टॉस) सायंकाळी 5 वाजता होईल.

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘जिओहॉटस्टार’ (JioHotstar) ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. हिंदी आणि इंग्रजीसह विविध भाषांमध्ये समालोचन उपलब्ध असेल.

हा सामना ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’च्या विविध वाहिन्यांवर थेट प्रसारित केला जाईल. मराठीसह अनेक भाषांमध्ये समालोचन उपलब्ध असेल.

कार्डिफमधील टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने या मैदानावर चार सामने खेळले असून त्यापैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना त्यांना एकदा विजय आणि एकदा पराभव पत्करावा लागला आहे. आता आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---