चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारपासून(१३ फेब्रुवारी) कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एका बाजूने ३ विकेट्स नियमित कालांतराने गेल्याने भारताची अवस्था ३ बाद ८६ धावा अशी झाली होती. पण यावेळी आक्रमक खेळत असलेल्या सलामीवीर रोहितने अजिंक्य रहाणेला साथीला घेत भारताचा डाव सावरला. त्याने ५० चेंडूंच्या आतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पुढे १३० चेंडूत शतकी खेळी केली.
रोहितचे ४० वे शतक –
रोहितचे हे कसोटीतील एकूण सातवे शतक आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चाळीसावे शतक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चाळीस शतके करणारा तो भारताचा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी असा पराक्रम सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविडने केला आहे. सचिनने १०० शतके, विराटने ७० शतके आणि द्रविडने ४८ शतके केली आहेत.
गावसकरांना टाकले मागे –
रोहितचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सलामीवीर म्हणून खेळताना हे ३५ वे शतक आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके करणारा तिसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने हा विक्रम करताना सुनील गावसकरांच्या सलामीवीर म्हणून केलेल्या ३४ शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर ४५ शतकांसह सचिन तेंडुलकर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ३६ शतकांसह विरेंद्र सेहवाग आहे.
भारतात २०० षटकार पूर्ण –
रोहितने त्याचे शतक करताना २ षटकार मारले. त्यामुळे रोहितचे भारतात २०० षटकार पूर्ण झाले आहेत. तो भारतात २०० षटकार पूर्ण करणारा पहिला आणि सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. भारतात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित पाठोपाठ १७९ षटकारांसह एमएस धोनी आहे.
याबरोबरच रोहितने भारतात कारकिर्दीतील १२३ व्या डावात फलंदाजी करताना २०० षटकार पूर्ण केले आहेत. त्यामुळे तो मायदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० षटकार पूर्ण करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी हा विक्रम मार्टिन गप्टिलच्या नावावर होता. गप्टीलने न्यूझीलंडमध्ये १६१ डावात २०० षटकार पूर्ण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
शर्माजी का बेटा ‘हिट’, शतकासह ‘या’ विक्रमात टाकलं गावसकरांनाही मागे
रो-हिट मॅन शो इज ऑन..! इंग्लिश गोलंदाजांना चोप-चोप चोपलं, रोहितचं शानदार शतक; पाहा सेलिब्रेशन
मोईन अलीच्या जबरदस्त चेंडूने स्टंप्सचा भुगा, स्वत: विराट कोहलीही अवाक्; पाहा भन्नाट व्हिडिओ