---Advertisement---

IND vs ENG: पुणे टी20 सामन्यासाठी MCA स्टेडियम सज्ज! सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट

On: शुक्रवार, जानेवारी 31, 2025 10:10 AM
---Advertisement---

आज (31 जानेवारी) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात असून टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सामन्याचा टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होईल, तर सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

या मालिकेतील पहिला आणि दुसरा टी20 सामना टीम इंडियाने जिंकला होता. तर इंग्लंडने तिसरा टी20 जिंकला. अशा परिस्थितीत, आज सूर्यकुमार यादवचा संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर दुसरीकडे वेळी इंग्लंड संघ मालिकेत टिकून राहण्यावर लक्ष केंद्रित करतील. मात्र पुण्यात टीम इंडियासाठी विजय सोपा असणार नाही.

पुण्यातील या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड संमिश्र राहिला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारताने आतापर्यंत चार टी20 सामने खेळले आहेत. या दरम्यान भारतीय संघाने दोन सामने जिंकले आहेत आणि दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजही भारत आणि इंग्लंडमध्ये रंजक स्पर्धा पाहायला मिळते.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकते. याठिकाणी फिरकी गोलंदाजांना मधल्या षटकांमध्ये चांगले वळण मिळू शकते. मैदान इतके मोठे नाही, त्यामुळे येथे षटकार आणि चौकार मारणे इतके अवघड नाही. दवाचा प्रभाव येथे राहू शकतो. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

भारतासाठी आनंदाची बातमी अशी आहे की युवा फिनिशर रिंकू सिंग तंदुरुस्त झाला आहे. तो आज खेळताना दिसेल. अशा परिस्थितीत, ध्रुव जुरेल संघातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरलाही बाहेरचा रस्ता दाखवता जाईल. त्याच्या जागी शिवम दुबे किंवा रमणदीप सिंग यांना संधी दिली जाऊ शकते.

टीम इंडियाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन – संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर/रमणदीप सिंग/शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.

यासामन्यापूर्वी इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलेली नाही. परंतु इंग्लिश संघ कोणताही बदल न करता प्रवेश करू शकतो. जर जेकब बेथेल तंदुरुस्त झाला तर त्याला जेमी स्मिथच्या जागी संधी दिली जाऊ शकते. जर तो तंदुरुस्त नसेल तर इंग्लिश संघ त्याच संघासोबत मैदानात उतरू शकतो.

इंग्लंडचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन – बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल / जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड

हेही वाचा-

चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी या दिवशी भारतीय संघ दुबईला रवाना होणार, स्पर्धेपूर्वी टीम इंडियाबाबत मोठे अपडेट्स समोर
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, कर्णधारांचे फोटोशूट रद्द! मोठे कारण समोर
मुंबई इंडियन्सनं सहावा संघ विकत घेतला! अंबानी कुटुंब इंग्लंडमध्ये आपला झेंडा फडकवण्यास सज्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---