भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराह याचे नाव कमी करण्यात आले आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये बुमराहने भारतासाठी महत्वपूर्ण प्रदर्शन केले. पण संघ व्यवस्थापनाकडून चौथ्या कसोटी सामन्यात त्याला विश्रांती दिली गेली. पण आता जसप्रीत बुमराहची संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार रांचीमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) खेळणार होता. पण संघ व्यवस्थापनानेनेच त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. माहितीनुसार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्व सामने खेळण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला होता. पण संघ व्यवस्थापन त्याचे वर्कलोड आणि दुखापत होणार नाही, याची काळजी घेत आहे. याच कारणास्तव इच्छा नसताना बुमराहला रांची कसोटीत विश्रांती मिळाली आहे.
मालिकेतील बुमराहच्या प्रदर्शनावर एक नजर टाकली, तर वेगवान गोलंदाजने सर्वांनाच प्रभावित केले आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये बुमराहने 13.65च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या आहेत. आता रांची कसोटीत बुमराह भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही म्हटल्यावर इंग्लिश फलंदाजांसाठी ही एकप्रकारे चांगली बातमी म्हणता येईल.
दरम्यान, भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना मोठ्या अंतराने जिंकला होता. पाहुणे विजयापासून तब्बल 434 धावांच्या अंतरावर असताना भारताने सामन्यातील शेवटची विकेट मिळवली. तत्पूर्वी इंग्लंडने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेची सुरुवात मात्र जबरदस्त केली होती. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 28 धावांनी पराभव स्वीकारला होता. पण शेवटच्या दोन कसोटी सामन्यात भारातने अनुक्रमे 106 आणि 434 धावांनी विजय मिळवला. चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारी रोजी रांचीमध्ये सुरू होणार आहे. भारतीय संघ सध्या 2-1 अशा आगाडीवर आहे. रांचीममध्ये विजय मिळवल्यानंतर मालिकाच भारताच्या नावावर होईल. दुसरीकडे इंग्लंड मात्र मालिकेत बरोबरी करण्यासाठी खेळेल.
महत्वाच्या बातम्या –
आता रोखून दाखवा! आयपीएल कमबॅकसाठी रिषभ पंत रेडी, सराव सामन्यात पाडला धावांचा पाऊस
AUS Vs NZ : पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय, न्यूझीलंडला 6 विकेट्सने दिली मात