भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. तर या पाच सामन्यांच्या मालिकेमधील दोन सामने झाले असून दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून मालिकेत बरोबरीत साधली आहे. तर आता तिसरा कसोटी सामना गुजरातमधील राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तसेच या सामन्याआधी माजी कर्णधार मायकेल वॉनने भीती इंग्लंड संघाला वॉर्निंग दिली आहे.
याबरोबरच, मायकेल वॉनने इंग्लंडच्या फलंदाजांना भारतात यशस्वी होण्यासाठी आक्रमक आणि पारंपारिक क्रिकेट शैलींमध्ये संतुलन राखण्याचा सल्ला देखील दिला आहे. तर ‘बझबॉल’ पद्धतीचा अवलंब केल्यापासून इंग्लंडला कसोटी क्रिकेटमध्ये चांगले यश मिळाले आहे. मात्र, बझबॉलच्या या खेळीमुळे संघाला काही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यात ॲशेस मालिकेतील सामन्यांचाही समावेश आहे.
घ्या जाणून मायकेल वॉनने इंग्लंडला का दिला इशारा
मायकेल वॉनने ‘द टेलिग्राफ’ मध्ये लिहिले आहे की, ‘इंग्लंड एक असा संघ बनला आहे ज्यावर जास्त टीका केली जाऊ शकत नाही. कारण ते खेळ पाहण्यास खूप चांगले आहेत. सध्याच्या संघाच्या खेळाने आम्ही खूप प्रभावित झालो आहोत आणि बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सुधारणा देखील केली आहे. तसेच, मायकेल वॉनने पुढे बोलताना म्हंटले आहे की, मला भिती वाटते की ते एक असा संघ बनू शकतात जे इतके चांगले प्रदर्शन करूनही अनेक सामने जिंकू शकत नाहीत.
याबरोबरच, भारतातील पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली होती, पण बेन स्टोक्सच्या संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने शानदार पुनरागमन करत विजय मिळवला आहे. तर, इंग्लंडसाठी जॅक क्रॉली वगळता त्यांच्या सर्व फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. वॉन म्हणाला आहे की, ‘इंग्लंड संघाने विशाखापट्टणमप्रमाणे फलंदाजी सुरू ठेवली तर मालिका जिंकता येणार नाही. मला वाटते की फलंदाजांनी आमच्या गोलंदाजांकडून काहीतरी शिकले पाहिजे. आमच्या गोलंदाजांनी पारंपारिक आणि बझबॉल शैलीचे उत्तम मिश्रण केले आहे.
दरम्यान, वॉनने संघाच्या फलंदाजांना गरजेनुसार आक्रमक पध्दतीचा अवलंब करण्याचा सल्ला देखील दिला आहे. पण युवा फिरकी गोलंदाजांचे कौतुक करत म्हणाला आहे की, ‘युवा फिरकीपटू उत्कृष्ट आहेत. जेम्स अँडरसनने अप्रतिम कामगिरी केली आहे. अँडरसनला पाठिंबा देण्यासाठी संघाला कदाचित दुसरा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन मैदानात उतरवावा लागेल.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG : बुमराह आणि अँडरसन यांच्यातील क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज कोण? जाणून व्हाल थक्क…
फॉर्ममध्ये असताना विलियम्सन घेणार माघार, आनंदाच्या कारणास्तव नाही खेळणार ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका