हैदराबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 175 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाखेर भारताची धावसंख्या 110 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 421 धावा आहे. दिवसाच्या सुरुवातील भारताची धावसंख्या 1 बाद 119 धावा होती. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना जास्त धावा करू शकले नाही. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातील या दोघांनी विकेट्स गमैवल्या. पण त्यानंतर केएल राहुल याने 86 धावांची सर्वोत्तम खेळी केली.
दुसऱ्या दिवशी इंग्लंडसाठी टॉम मार्टली आणि जो रुट यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर रेहान अहमद यालाही एक विकेट मिळाली. दुसऱ्या दिवसाची सुरुवात यशस्वी जयस्वाल याने वैयक्तिक 76* धावांवर केली. पण दुसऱ्या दिवसाच्या चौथ्याच चेंडूवर त्याने विकेट गमावली. जयस्वाल वैयक्तिक 80 धावांची खेळी करू बाद झाला, जी संघासाठी नक्कीच महत्वाची ठरली. शुबमन गिल याच्या रुपात भारताने तिसरी विकेट गमावली. 35व्या षटकात गिल वैयक्ति 23 धावांची खेळी करून बाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला केएल राहुल मात्र चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याच्याकडून शतकाची अपेक्षा होत असतानाच राहुलने 65व्या षटकात विकेट गमावली. त्याआदी 53व्या षटकात श्रेयस अय्यर 35 धावा करून बाद झाला. यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरत यानेही 41 धावांचे योगदान दिले.
दिवसाखेर रविंद्र जडेजा 81*, तर अश्रर पटेल 35* धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत. दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजा कसोटी कारकिर्दीतील आपले चौथे शतक करताना दिसू शकतो. (IND vs ENG. India in the lead at the end of the second day of the Hyderabad Test, Jadeja on the verge of a century)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड संघ : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये मोठा उलटफेर! यानिक सिनरने जोकोविचला दाखवला बाहेरचा रस्ता
IND vs ENG: इंग्लंडविरुद्धही शुबमन गिलचा ‘फ्लॉप शो’, टीम इंडिया आणखी किती संधी देणार?