भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रद्द केला गेला होता, जो यावर्षी खेळला जाईल. कसोटी सामन्यानंतर भारताला टी-२० मालिका खेळायची आहे, पण या टी-२० मालिकेविषयी महत्वाची माहिती सध्या समोर येत आहे.
माध्यांनीत वृत्तानुसार विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या दिग्गजांना इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. माध्यामांतील वृत्तानुसार आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी जो युवा भारतीय संघ निवडला गेला आहे, तोच युवा खेळाडूंचा संघ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत मैदानात उतरवला जाऊ शकतो. म्हणजेच आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याला इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरोधातही कर्णधार बनण्याची संधी मिळू शकते.
माध्यामांतील सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे की, मागच्या वर्षीचा रद्द झालेला कसोटी सामना १ जुलैपासून ५ जुलैपर्यंत खेळला जाईल. तसेच तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा पहिला सामना ७ जुलैला असेल. अशात कसोटी मालिका खेळलेल्या संघाला लगेच टी-२० मालिका खेळणे सोपे जाणार नाही. याच कारणास्तव जो संघ आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत निवडला गेला आहे, तोच संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका देखील खेळू शकतो. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे. परंतु भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी अद्याप संघ घोषित केला नाहीये.
१ जुलै – मागच्या वर्षीच्या कोसोटी मालिकेतील पाचवा सामना – एजबास्टेन, बर्मिंघम
७ जुलै – पहिला टी-२० सामना – साउथँपटन
९ जुलै – दुसरा टी-२० सामना – बर्मिंघम
१० जुलै – तिसरा टी-२० सामना – नॉटिंघम
१२ जुलै – पहिला एकदिवसीय सामना – लंडन
१४ जुलै – दुसरा एकदिवसीय सामना – लंडन
१७ जुलै – तिसरा एकदिवसीय सामना – मॅनचेस्टर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चोट तो बहाना है, सुनिल शेट्टी की लडकी को घुमाना है..! केएल राहुल होतोय ट्रोल
टी२०चा दांडगा अनुभव अन् दमदार फॉर्म असूनही ‘या’ खेळाडूला टी२० विश्वचषकात नाही मिळणार जागा
फलंदाजी नव्हे तर स्लिपमध्ये झेल पकडण्याचा सराव करतोय पुजारा, अजिंक्य रहाणे आहे कारण