---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या खेळाडूंचे होणार कमबॅक!

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. पण लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) खेळाडूंची घोषणा करू शकते. ज्यामध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरचे पुनरागमन होऊ शकते. त्याच्यासोबत अर्शदीप सिंगलाही पुनरागमनाची संधी मिळू शकते. अय्यरने अलीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. अर्शदीपही लयीत दिसत आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका बातमीनुसार, पांड्या, अय्यर आणि अर्शदीप सिंग टीम इंडियामध्ये परत येऊ शकतात. पांड्या बऱ्याच दिवसांपासून भारताच्या वनडे संघातून बाहेर आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. तर शेवटचा टी20 सामना नोव्हेंबर 2024 मध्ये खेळला गेला होता. पांड्या सध्या देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळत आहे. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी डोळ्यासमोर ठेवून पांड्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळू शकते.

श्रेयस अय्यरने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने पुद्दुचेरीविरुद्ध स्फोटक शतक झळकावले. अय्यरने 137 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याने कर्नाटकविरुद्धही शतक झळकावले. अय्यरने या सामन्यात नाबाद 114 धावा केल्या होत्या. अश्या स्थितीत शानदार लयीत असणाऱ्या अय्यरला टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

अर्शदीप सिंग देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळत आहे. ज्यात त्याने आक्रमक गोलंदाजी केली आहे. अर्शदीपने पुद्दुचेरी आणि हैदराबादविरुद्ध 4-4 विकेट घेतल्या. मुंबईविरुद्ध 5 बळी घेतले. कर्नाटक आणि सौराष्ट्रविरुद्धही त्याने चमकदार गोलंदाजी केली.

चॅम्पियन्स ट्राॅफी 2025 पूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध ही एकमेव वनडे मालिका खेळणार आहे. अश्या परिस्थितीत या मालिकेत निवड होणारे खेळाडू हे चॅम्पियन्स ट्राॅफीच्या संघात ही दिसू शकतात. त्यामुळे बीसीसीआय टीम इंडियाची घोषणा कधी करणार हे पाहणे निर्णायक ठरणार आहे.

 हेही वाचा-

‘लेडी झहीर खान’ने केले क्रीडामंत्र्यांना क्लीन बोल्ड, व्हायरल VIDEO सोशल मीडियावर चर्चेत
वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधारपदात मोठा बदल
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार? स्पर्धेचे ‘कट-ऑफ’ डेट समोर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---