इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND), एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाच्या आहे. यासाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कसून तयारी केली आहे. या सामन्यासाठी भारताचे नेतृत्व नवखा कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) करणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) कोरोना टेस्टमध्ये पुन्हा पॉजिटीव्ह आढळल्याने तो या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्यातच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने नेटमध्ये केलेल्या फलंदाजीच्या सरावाचा व्हिडिओ व्हायरला झाला आहे.
विराटने नेटमध्ये जोरात सराव केला असून प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याचे त्याच्याकडे विशेष लक्ष होते. या व्हिडिओमध्ये तो अप्रतिम शॉट्स खेळताना दिसला. यावेळी त्याने वेगवान गोलंदाजांच्या चेडूंचा सामना केला आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून अप्रतिम खेळीची अपेक्षा असणार आहे. त्याने मागील दोन वर्षांपासून मोठी खेेळी केलेली नाही.
“विराटने त्याच्या खेळाचा स्तर इतका उंच नेला आहे. ज्यामुळे त्याच्याकडून नेहमी शतकाची अपेक्षा केली जाते. त्याने नेहमी शतकी खेळी करावी हे चूकीचे आहे. त्याने शतकी नाही तर संघासाठी सामनाविजयी खेळी करावी,” असे मत द्रविड यांनी व्यक्त केले आहे.
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) June 30, 2022
एजबॅस्टन कसोटी सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. मागील वर्षी खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. चार सामने भारत विराटच्या नेतृत्वाखाली खेळला. यामध्ये भारताने २-१ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला हा सामना जिंकणे किंवा अनिर्णीत राखणे आवश्यक आहे. मात्र इंग्लंड संघाचा सध्याचा फॉर्म पाहत हे वाटते तितके सोपे नाही.
इंग्लंडने नुकतेच घरच्या मैदानावर कसोटी चॅम्पियन न्यूझीलंड संघाला ३-० असा व्हाईटवॉश दिला आहे. यामुळे त्यांचे मनोबल उंचावले असून ते हा सामना जिंकण्याच्याच इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्यातच एजबॅस्टनचा इतिहास पाहता भारताने येथे ७ सामने खेळले असून यामध्ये इंग्लंड ६ सामने जिंकला आहे. एक सामना १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली अनिर्णीत ठेवण्यात संघाला यश आले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एजबॅस्टन कसोटी: कर्णधार बदलले, प्रशिक्षक बदलले आता तर आयसीसीने नियमही बदलले
Fifth Test: भारताकडे १५ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी, तर इंग्लंडचा ब्रॉडही रचू शकतो इतिहास
विराटवर पुन्हा ‘ती’ दणकेबाज खेळी खेळण्याची जबाबदारी, जिंकून देऊ शकतो निर्णायक कसोटी