---Advertisement---

सो क्यूट! खूप दिवसांनी पत्नीला भेटला सूर्यकुमार यादव, दिसताच मारली कडकडून मिठी- PHOTO

On: शनिवार, जून 25, 2022 12:59 PM
---Advertisement---

भारताचा संघ शुक्रवारी (२४ जून) आयर्लंडला पोहोचला. काही खेळाडूंनी त्यांचे आयर्लंडमधील फोटोही शेयर केले आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. या मालिकेत भारत हार्दिक पांड्या (Hardik pandya) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचाही संघात समावेश आहे. यावेळी आयर्लंडमध्ये पोहोचताच त्याला एक सरप्राईज मिळाले आहे.

यादवला दुखापतीमुळे बंगळुरू येथे असलेल्या एनसीएमध्ये (राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी) जावे लागले होते. तेथे त्याने खूप मेहनत केली. तो दुखापतीमधून पूर्णपणे बरा झाला असता भारतीय संघासोबत आयर्लंडला रवाना झाला. यावेळी त्याची आयर्लंडमध्ये त्याच्या पत्नीशी गाठ पडली आहे. ती इंग्लंडमधून आयर्लंडला आली होती. यादवला दुखापतीमुळे तिच्याशी भेट घेता आली नव्हती. तो खूप दिवसानंतर पत्नीला भेटला असता. या भेटीची स्टोरी त्याने ‘आपण पुन्हा भेटलो’ असे कॅप्शन टाकत सोशल मीडियावर शेयर केली आहे. त्याच्या पत्नीने ‘तुझी आठवण आली’ असे कॅप्शन टाकत स्टोरी शेयर केली आहे.

Photo Courtesy: Instagram/ Suryakumar Yadav

यादवला दुखापतीमुळे आयपीएलचे (इंडियन प्रीमियर लीग) काही सामने आणि दक्षिण आफ्रिकेच्या टी२० मालिकेला मुकावे लागले होते. आता तो पूर्णपणे तंदुरूस्त असून त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंग्लड दौऱ्यात भारत तीन सामन्यांची टी२० आणि तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

भारत विरुद्ध आयर्लंड पहिला टी२० सामना २६ जूनला डबलिन येथे खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार या सामन्याला रात्री ९ वाजता सुरूवात होणार आहे. दुसरा टी२० सामना २८ जूनला याच मैदानावर खेळला जाणार आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे:
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भारताविरुद्ध दोन हात करण्यास आयर्लंडचा संघ झाला सज्ज, ‘या’ खेळाडूंवर असणार विशेष लक्ष

‘देव आपल्याला वाचवणार नाही म्हणत,’ धोनीने खेळाडूंना केले प्रोत्साहित; मग काय भारत बनला चॅम्पियन

जेव्हा विश्वचषक जिंकल्यानंतर विरोधी संघाकडून दारु उधार घेत ‘कपिल पाजीं’नी केले होते सेलिब्रेशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---