---Advertisement---

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहने घडवला इतिहास, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा फक्त 5वा भारतीय कर्णधार

On: गुरूवार, ऑगस्ट 24, 2023 8:53 AM
Team-India
---Advertisement---

डब्लिन येथील भारत विरुद्ध आयर्लंड संघातील तिसऱ्या टी20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. मुसळधार पावसामुळे पंचांनीही नाणेफेक झाली नाही आणि एकही चेंडूचा खेळ न होता पंचांना सामना रद्द करावा लागला. अशात भारताने ही मालिका 2-0ने आपल्या खिशात घातली. या मालिकेतील कामगिरीसाठी कर्णधार जसप्रीत बुमराह मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. हा पुरस्कार पटकावताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. बुमराहने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या क्लबमध्ये एन्ट्री केली.

जसप्रीत बुमराहचा विक्रम
आयर्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण केले. तो या क्रिकेट प्रकारात संघाचे नेतृत्व करणारा 11वा खेळाडू बनला. मात्र, आपल्या नेतृत्वाखाली पहिलीच मालिका जिंकून त्याने विक्रम रचला. तो मालिकावीर पुरस्कार जिंकणारा पाचवा भारतीय कर्णधार बनला आहे. या यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांसारखे दिग्गज खेळाडूही आहेत.

सर्वाधिक पुरस्कार विराटच्या नावे
सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी आहे. विराटने यापूर्वी 3 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. तसेच, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना प्रत्येकी 1 वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकण्यात यश आले आहे.

https://twitter.com/BCCI/status/1692588067595640932

बुमराहचे दमदार प्रदर्शन
पाठीच्या दुखापतीनंतर बुमराहने दमदार प्रदर्शन केले. त्याने आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यात मिळून 4 विकेट्स घेतल्या. बुमराहला आशिया चषक 2023 स्पर्धेच्या भारतीय संघातही जागा मिळाली आहे. त्याच्यासोबतच रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनीही चांगली गोलंदाजी केली. बिश्नोईने 4 विकेट्स, तर प्रसिद्धनेही 4 विकेट्स घेतल्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋतुराज गायकवाड अव्वलस्थानी आहे. त्याने 2 सामन्यात 77 धावा केल्या. तसेच, पाचव्या स्थानी असलेल्या यशस्वी जयसवाल याने 2 सामन्यात 42 धावा आणि सहाव्या स्थानी असलेल्या संजू सॅमसन याने 41 धावा केल्या.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार भाताने 2 धावांनी जिंकला होता. तसेच, दुसऱ्या सामन्यात भारताने यजमान आयर्लंडला 33 धावांनी पराभूत केले होते. तिसरा सामना पावसामुळे खेळला जाऊ शकला नाही. अशाप्रकारे भारताने ही मालिका 2-0ने नावावर केली. आता 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज होत आहे. (ind vs ire skipper jasprit bumrah won player of the series award dublin 3rd t20)

हेही वाचा-
दमदार कमबॅक, प्रदर्शनही झक्कास! मालिकावीर बनताच बूम बूम बुमराह म्हणाला, ‘सतत वाट पाहणे कंटाळवाणे…’
‘तो हार्दिकचा बॅकअप बनूच शकत नाही’, म्हणत Asia Cup 2023पूर्वी गंभीरचा CSKच्या स्टार खेळाडूला पाठिंबा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---