यंदाच्या अंडर 19 आशिया कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाने पहिला विजय नोंदवला आहे. या सामन्यात टीम इंडियाने जपानच्या संघाचा पराभव केला. भारतीय संघासाठी स्पर्धेची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्या सामन्यात त्यांना पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. भारताने हा सामना 211 धावांनी जिंकला. जपानविरुद्धच्या विजयामुळे टीम इंडियाच्या नेट रनरेटमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. या सामन्यात टीम इंडियाने अष्टपैलू कामगिरी केली आहे.
भारत विरुद्ध जपान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात जपानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावून 339 धावा केल्या. ज्यात टीम इंडियाचा कर्णधार मोहम्मद अमानने शानदार शतक झळकावले. अमनने या सामन्यात 118 चेंडूत 122 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने सात चौकार मारले. त्याशिवाय केपी कार्तिकेयनेही चांगली खेळी खेळली. त्याने 49 चेंडूत 57 धावा केल्या. त्याच्या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार मारला. सलामी साठी आलेल्या आयुष म्हात्रेने देखील 29 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने भारताला चांगली सुरुवात करून दिली.
Captain ✅
Number 7 Jersey ✅
Hundred in U-19 Asia Cup ✅REMEMBER THE NAME – MOHAMED AMAAN 🇮🇳 pic.twitter.com/IbzTqnos6Z
— Johns. (@CricCrazyJohns) December 2, 2024
भारताने दिलेल्या 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या जपानच्या संघाला 50 षटकात 8 गडी गमावून केवळ 128 धावा करता आल्या. या सामन्यात जपानने अतिशय संथ फलंदाजी केली आहे. त्यामुळे संघ लक्ष्याच्या जवळही पोहोचू शकला नाही. जपानकडून सलामीचा फलंदाज ह्यू केली याने 111 चेंडूत 50 धावा केल्या. त्याची खेळी अतिशय संथ होती. त्यामुळे त्यांचा संघ लक्ष्यापासून खूप मागे राहिला. या सामन्यातील विजयामुळे टीम इंडिया गुणतालिकेत +1.680 च्या निव्वळ रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
India U19 secures a resounding 2️⃣1️⃣1️⃣ run victory over Japan U19 with a stellar all-round performance. After posting a massive total, the bowlers tightened their grip, restricting Japan to just 128 runs. A commanding win for the Boys in Blue!#ACC #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/XXowecGiCI
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 2, 2024
हेही वाचा-
IPL 2025; आगामी आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन खतरनाक?
“माझा मुलगा तेंडुलकरपेक्षा मोठा बनेल…” माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य!
BAN vs WI; बांगलादेशला मिळाला नवा कर्णधार! 3 वर्षांनी खेळणार ‘हा’ खेळाडू!