न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ सहज विजय मिळवेल, असी परिस्थिती दिसत होती. पण पाहुण्या न्यूझीलंड संघाने अखेरपर्यंत हार मानली नाही. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 7 धावांची आवश्कता होती. सूर्यकुमार यादव याने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार मारला आणि सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करणारा न्यूझीलंड संघ 100 धावांची टप्पाही पार करू शकला नव्हता. अखेरच्या षटकात मैदानात तनावपूर्ण परिस्थिती होती, पण सूर्यकुमारच्या चौकाराच्या जोरावर भारत विजयी झाला.
भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सामन्याच्या सुरूवातील नाणेफेकीत पराभूत झाला. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझालंड संघ 8 बाद 99 धावा करू शकला. खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे न्यूझीलंड संघ मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. न्यूझीलंडचा एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. भारतासाठी हार्दिक पड्या, वॉशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, दीपक हुड्डा, आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. मागच्या सामन्यात संघाला महागात पडलेला अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या सामन्यात इतरचांच्या तुलनेत चांगले प्रदर्शन करू शकला. अर्शदीप सिंगने 2 षटकात 7 धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या.
Vice-captain @surya_14kumar remained unbeaten in a tricky chase and bagged the Player of the Match award as #TeamIndia registered a 6-wicket victory in Lucknow 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/p7C0QbPSJs#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/LScLxZaqfq
— BCCI (@BCCI) January 29, 2023
विजयासाठी 100 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर भारत सहज विजय मिळवेल, असे चित्र दिसत होते. पण न्यूझीलंडने या सामन्यात बारतीय संघाचा चांगलाच घाम काढला. सामना शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूपर्यंत चालला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) खेळपट्टीवर असल्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळत होता आणि या दोघांनी संघाला विजय देखील मिळवून दिला. सूर्यकुमारने संघासाठी सर्वात जास्त 26 धावा केल्या. तर हार्दिकने 15 धावांवर नाबाद होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“पुढच्या महिन्यात दुसरा वर्ल्डकप जिंकायचाय”, शफालीने व्यक्त केला आत्मविश्वास
BIG BREAKING! पोरींनी रचला इतिहास, U19 टी20 विश्वचषकावर भारताने कोरले नाव