न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप झाल्यानंतर भारतीय संघाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: भारताच्या अनुभवी फलंदाजांना अधिक लक्ष्य केले जात आहे, जे संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरले. अनुभवी फलंदाज विराट कोहलीने भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील 6 डावात 15.50 च्या सरासरीने 93 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माने 15.17 च्या सरासरीने 91 धावा केल्या. त्यांच्या सुमार प्रदर्शनामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. अशातटच इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने कोहली आणि रोहितवर टीकास्त्र सोडले आहे.
पीटरसनने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या जुन्या विधानातील काही ओळी शेअर केल्या, ज्यामध्ये त्याने खेळाडूंच्या खराब सरासरीची खिल्ली उडवली आहे.
पीटरसनने पाँटिंगचे जुने विधान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. यामध्ये पँटिंग म्हणतोय, ‘जेव्हा मी क्रिकेट खेळत होतो, तेव्हा कोणत्या खेळाडूची फलंदाजी सरासरी 35 असती, तर त्याच्या वडिलांनी त्याला बास्केटबॉल किंवा फुटबॉल विकत आणून दिला असता आणि खेळायला लावला असता.’
पीटरसनच्या या पोस्टवर अनेक क्रिकेट चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, “हे अलीकडील मालिकेतील सीनियर भारतीय फलंदाजांची कामगिरी दर्शवते का?” दुसरा म्हणाला, “म्हणजे तुम्ही म्हणताय की विराट आणि रोहितने निवृत्ती घ्यावी? त्याची काळजी करू नका. तुम्ही दूर राहा, आम्ही बघू.”
ABSOLUTE FACT! pic.twitter.com/zEOwTSYYT3
— Kevin Pietersen🦏 (@KP24) November 4, 2024
पीटरसनने सल्ला दिला
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फिरकी गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाज खूप संघर्ष करताना दिसले. फिरकीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी वेळ लागतो, जर तुम्ही संयमाने पुढे गेलात तर तुम्हाला फळ मिळेल, असा सल्ला पीटरसनने दिला.
पीटरसनने आणखी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीचा वापर आणि तंत्राचा अभाव पाहून कोणीही आश्चर्यचकित होऊ नये. क्रिकेट हा आता ‘स्मॅकर्स’ खेळ बनला आहे आणि कसोटी सामन्यातील फलंदाजीचे कौशल्य या खेळात मोडीत काढले जात आहे. जेव्हा स्पिनविरुद्ध खेळण्याचा विचार येतो तेव्हा त्याच्याविरुद्ध तासनतास खेळणे हा एकमेव मार्ग आहे. वेगवान फलंदाजी हा उपाय नाही.’
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी अपडेट! मोहम्मद शमी रणजी ट्राॅफी स्पर्धेतून बाहेर! बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीचे दरवाजे बंद
IND vs SA; टी20 मालिकेचं पूर्ण वेळापत्रक! कधी आणि कुठे पाहायचे सामने, जाणून घ्या सर्वकाही
AUS vs PAK; बाबर आझमचे संघात पुनरागमन, पाकिस्तानचा ऑस्ट्रलियाकडून पराभव