---Advertisement---

गिल दुसऱ्या कसोटीसाठी उपस्थित! या खेळाडू्चा पत्ता कट? सर्फराजच्या शतकामुळे कर्णधाराची डोकेदुखी वाढली

On: रविवार, ऑक्टोबर 20, 2024 7:34 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. जो पावसामुळे 16 ऑक्टोबर ऐवजी 17 ऑक्टोबरपासून सुरू झाला. संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिल मानेच्या दुखण्यामुळे या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत सर्फराज खानला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले. त्यानेही संधीचा पुरेपूर फायदा घेतला. मात्र, आता गिलच्या पुनरागमनामुळे दुसऱ्या कसोटीत प्लेइंग 11 मधून कोणत्या खेळाडूला बाहेर काढले जाईल. याचा विचार करण्यासारखे आहे.

बेंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात सर्फराज खानला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली. मात्र दुसऱ्या डावात त्याने आपली लय परत मिळवली. त्याने 150 धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीमुळे रोहितचे टेन्शन वाढले आहे. दुसऱ्या डावातही सर्फराजची बॅट शांत राहिली असती. तर रोहितने गिलला सहज दुसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केले असते.

पण आता जर सर्फराज खान दुसऱ्या कसोटीत बाहेर झाला, तर रोहित शर्मासोबतच संघ व्यवस्थापनावर टीका होणार हे निश्चित. अशा परिस्थितीत यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यापैकी कोणीही दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडू शकतो. जयस्वालला दोन्ही डावात अनुक्रमे 13, 35 धावा करता आल्या. दुसऱ्या डावात तो खराब शॉट खेळल्यामुळे बाद झाला. ज्याची त्यावेळी अजिबात गरज नव्हती.

अनुभवी फलंदाज केएल राहुल संघ व्यवस्थापनाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरला नाही. पहिल्या डावात राहुल शून्यावर बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याने केवळ 12 धावा केल्या. स्वत:ला सिद्ध करण्याची यापेक्षा चांगली संधी त्याला कधीच मिळाली नाही.

न्यूझीलंडच्या पहिल्या डावात डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाने तीन बळी घेतले. पण सामन्यात त्याची बॅट शांत राहिली. अश्या स्थितीत जडेजाची कामगिरी पाहता गिलच्या पुनरागमनानंतर दुसऱ्या कसोटीतून त्याचे पत्ते कापले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-

IND vs NZ; “लहानपणापासून हे माझे स्वप्न” शानदार शतक झळकावल्यानंतर स्टार खेळाडूने दिली प्रतिक्रिया
IND vs NZ; भारताचा पराभव टळला? शेवटच्या दिवशी असे असणार बेंगळुरूचे हवामान
VIDEO; पंतचा 107 मीटर लांबीचा गगनचुंबी षटकार पाहून चाहते थक्क!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---