---Advertisement---

कानपूर कसोटीत सपशेल फेल ठरलेल्या मयंकच्या शैलीत आहे ‘या’ गोष्टीची कमी, दिग्गजाने दाखवली उणीव

On: शुक्रवार, नोव्हेंबर 26, 2021 5:17 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला. सामन्यातील पहिल्या डावात भारताने ३४५ धावा केल्या. मात्र, सलामीवीर मयंक अगरवालने निराशाजनक प्रदर्शन केले. मयंक सामन्याच्या पहिल्याच दिवशी अवघ्या १३ धावा करून बाद झाला. अशातच आता भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने मयंकच्या शैलीतील कमतरता दाखवून दिली आहे.

मयंकने तब्बल १० महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये या सामन्यातून पुनरागमन केले. त्याने या सामन्यात २८ चेंडूंचा सामना केला आणि १३ धावा केल्या. न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसन सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतासाठी महागात पडला. त्याने पहिल्या दिवशी ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. मयंक देखील त्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. मयंक जेमिसनने टाकलेल्या आठव्या षटकात यष्टीरक्षकाच्या हातात सोपा झेल देत झेलबाद झाला.

माजी भारतीय क्रिकेटपटू वसिम जाफर मयंकच्या अशा प्रदर्शनावर इसएपीएस क्रिकइंफोसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी मयंकच्या खेळीतील कमतरता दाखवून दिली. ते म्हणाले की, “मला वाटते तो या चेंडूला सोडू शकत होता. ज्याप्रकारे त्याने चेंडू खेळला, तो स्वतः निराश असेल. तो आधीही असा शॉट खेळण्यचा प्रयत्न करत होता आणि अनेकदा चुकला. त्याला बॅकफूटवर उभे राहण्याची सवय आहे. आउट स्विंग गोलंदाजांपासून त्याला काहीतरी अडचण आहे. त्याचा स्टांस मोकळा आहे, छाती खूप पुढे येते. त्याला त्याच्या खेळात या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. विशेषतः त्या परिस्थितीत जेथे थोडी मुवमेंट असेल. हेच आज झाले होते.”

“या छोट्या खेळीत मयंक अगरवाल वेगवान काइल जेमिसनच्या विरोधात संघर्ष करत होता. त्याच्या बॅटचा बाहेरचा कोपरा चेंडूला लागला. तो निराश असे की, त्याने हा चेंडू खेळला, ज्याला तो सोडू शकत होता,” असे जाफर पुढे म्हणाले.

दरम्यान, कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय संघ सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवशी जेवणानंतर भारतीय संघाने राहिलेले दोन विकेट्स गमावले आणि १११.१ षटकात ३४५ धावांवर संघाचा डाव संपला. भारतासाठी श्रेयस अय्यरने (१०५) शतकी खेळी केली. तर रवींद्र जडेजा (५०) आणि शुभमन गिलने (५२) अर्धशतक केले.  न्यूझीलंडसाठी टिम साउदीने दुसऱ्या दिवशी जबरदस्त गोलंदाजी केली, त्याने पहिल्या डावात एकूण पाच विकेट्स घेतल्या. तर काइल जेमिसनने तीन आणि एजाज पटेलने दोन विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

“पुढील कसोटीत श्रेयसला संधी मिळण्याची शक्यता कमी”; लक्ष्मणने केले भाकित

INDvNZ, 1st Test: कानपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना साजेशी, पण दुसऱ्या दिवशी भारताचे स्पिनर्स परतले रिकामे हात

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर; सलग ६ षटकार मारणाऱ्या खेळाडूला दिली संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---