भारतीय संघाने रविवारी (28 ऑगस्ट) आशिया चषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात केली. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्धच्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताच्या प्लेइंग इलेव्हनची माहिती दिली. युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत या सामन्यात महत्वाची भूमिका पार पाडेल अशी अपेक्षा सर्वांना होती, पण रोहितने दिलेल्या माहितीनुसार पंत प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी नाही. अशात यष्टीरक्षकाची भूमिका दिनेश कार्तिक पार पाडेल.
Captain @ImRo45 has won the toss and we will bowl first against Pakistan.
A look at our Playing XI for the game.
Live – https://t.co/o3hJ6VNfwF #INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/O0HQXFQzC4
— BCCI (@BCCI) August 28, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, आवेश खान
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, हरिस रौफ, नसीम शाह, शाहनवाज दहनी, मोहम्मद नवाज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
महायुद्धाला सुरूवात! नाण्याचे नशिब भारताच्या बाजूने; टीम इंडिया करणार बॉलने पहिला वार
मैदानात टीम आणि मैदानाबाहेर कोच एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज, एकदा आकडेवारी पाहाच
रोहित शर्मा पुन्हा व्हायरल! चाहत्याला म्हणाला, ‘भाऊ आधी…’