भारतीय संघाने रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. आशिया चषक 2022 मधील भारताचा हा पहिलाचा सामना होता, ज्यामध्ये संघाने विजय मिळवला. भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या या सामन्यात ज्या पद्धतीने खेळला, त्यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. शेवटच्या षटकात विजयी षटकार मारून त्यानेच संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, हार्दिक या प्रदर्शनाच्या जोरावर भारताचा माजी दिग्गज युवराज सिंगच्या बरोबरीला पोहोचला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ अवघ्या 147 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तार भारतीय संघाने हे लक्ष्य 19.4 षटकात आणि 5 विकेट्स राखून गाठले. कट्टर विरोधी पाकिस्तानला धूळ चारून भारताने आशिया चषकाची सुरुवात गोड केली. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या सामन्यात गोलंदाजी आणि नंतर फलंदाजी दोन्ही विभागांमध्ये संघासाठी फायदेशीर ठरला.
भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर हार्दिक पंड्याने 4 षटकांमध्ये 25 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजी करताना 17 चेंडूत ताबडतोड 33 धावा केल्या. एकाच टी-20 सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अशी कामगिरी 25 पेक्षा अधिक धावा आणि 3 विकेट्स) करणारा हार्दिक भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी दिग्गज युवराज सिंग (Yuvraj Singh) अशी कामगिरी करून बसला आहे. फरक फक्त एकवढाच आहे की, हार्दिकने अशी कामगिरी टी-20 क्रिकेटमध्ये तीन वेळा केली आहे, तर युवारज मात्र दोनच वेळा असे करू शकला होता.
एका टी-20 सामन्यात 25 धावा आणि तीन विकेट्स घेणारे भारतीय खेळाडू –
हार्दिक पंड्या – तीन वेळा
युवराज सिंग – दोन वेळा
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी हार्दिक पंड्यासोबतच भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने देखील महत्वाचे योगदान दिले. भुवनेश्वरने टाकेलल्या 4 षटकात 26 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. गोलंदाजांच्या या भेदक माऱ्यापुठे पाकिस्तान संघ संपूर्ण 20 षटकेही टिकू शकला नाही. 19.5 षटकात त्यांचा संपूर्ण संघ तंबूत परतला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या धमाकेदार विजयानंतर शरद पवारांचेही सेलिब्रेशन! पाहा व्हिडिओ
सोबत खेळता-खेळता विराटने केली रोहितची बरोबरी; ‘या’ विक्रमासाठी दोघात रंगणार पाठशिवणीचा खेळ
बदला पूर्ण! हार्दिक-जड्डूच्या तडाख्यात पाकिस्तान उडाली; आशिया कपमध्ये टीम इंडियाचा विजयी श्रीगणेशा