सध्या आशिया चषकाच्या आगामी हंगामातील भारत आणि पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. २७ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ २८ ऑगस्टो (रविवार) रोजी आमने सामने येणार आहेत. रविवारी खेळल्या जाणाऱ्या या सामन्यावर सर्वांचे लक्ष लागून आहेच, पाण चाहते अजून एका गोष्टीच्या प्रतिक्षेत आहेत. भारतासाठी विराट कोहली आणि पाकिस्तानसाठी बाबर आझम कसे प्रदर्शन करतो हे चाहत्यांना पाहायचे आहे.
आशिया चषका (Asia Cup-2022) स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या ग्रुप स्टेजमधील सामन्या या दोन्ही दिग्गजांचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल. विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांची नेहमीच तुलना होत आली आहे. विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हटले जाते. तर दुसरीकडे बाबर आझम देखील आता या यादीत सहभागी होताना दिसत आहे. बाबरचे मागच्या काही वर्षांमधील प्रदर्शन पाहिले, तर ते जबरदस्त म्हणावे लागेल. त्याच्या तुलनेत विराट मात्र, सध्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममधून जात आहे. या दोघांपैकी कोणा एकाला निवडणे तसे पाहिले तर कठीण आहे. परंतु आकड्यांच्या आधारी चाहत्यांसाठी ही निवड सोपी होऊ शकते.
२०२२ मध्ये विराट कोहलीची आकडेवारी (टी-२० क्रिकेट)
सामने – ४
धावा – ८१
सरासरी – २०.२५
सर्वोत्तम – ५२
२०२२ मध्ये बाबर आझमची आकडेवारी (टी-२० क्रिकेट)
सामने – १
धावा – ६६
सरासरी – ६६.००
सर्वोत्तम – ६६
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये विराटची एकंदरीत आकडेवारी
सामने – ९९
धावा – ३३०८
सरासरी – ५०.१२
स्ट्राईक रेट – १३७.६६
सर्वोत्तम प्रदर्शन – ९४*
शतक – ०
अर्शशतक – ३०
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये बाबर आझमची आकडेवारी
सामने – ७४
धावा – २६८६
सरासरी – ४५.५२
स्ट्राईक रेट – १२९.४४
सर्वोत्तम प्रदर्शन – १२२
शतक – १
अर्धशतक – २६
दरम्यान, विराटने पाकिस्तान संघाविरुद्ध आतापर्यंत एकूण ७ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ७७.७५ च्या सरासरीने आणि तीन अर्धशतकांच्या मदतीने ३११ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे बाबरने आतापर्यंत भारताविरुद्ध फक्त एक टी-२० सामना खेळला. या सामन्यात त्याने नाबाद ६८ धावांची खेळी केली होती. आकड्यांच्या आधारे हे दोन्ही फलंदाज एकमेकांपेक्षा सरस दिसतात.
विराट कोहली खेळपट्टीवर असताताना स्ट्राईक रेटोट करण्यासाठी ओळखला जातो. हवेत मोठे शॉट्स खेळण्यापेक्षा तो नेहमीच ग्राउंड शॉट खेळण्याला प्राधान्य देत असतो. तसेच फिरकी गोलंदाजी ही बाबर आझमची जमेची बाजू आहे. त्याचा स्वीप शॉट पाहण्यासाठी चाहते नेहमीच वाट पाहत असतात. विराटप्रमाणे बाबरदेखील हवेत कमी आणि ग्राउंट शॉट जास्त खेळत असतो. आता आशिया चषकातील सामन्यात या दोघांपैकी कोण सरस ठरतो हे, पाहावे लागेल. आशिया चषकात ग्रुप स्टेजव्यतिरिक्त सुपर ४ मध्येही हे संघ आमने सामने येऊ शकतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषक २०२२ बाबत मोठी बातमी समोर! स्पर्धेचे यजमानपद बांग्लादेशच्या पदरात
‘संघात हार्दिक नसला तर…’ शास्त्री गुरूजींनी टीम इंडियाला दिलाय इशारा
महाराजा टी२० ट्रॉफी: मयंकच्या शतकी ‘ब्लास्ट’ने बेंगलोर फायनलमध्ये; पाटीलचे शतक व्यर्थ