भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांची टी20 मालिका पूर्ण झाली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळलेली ही टी20 मालिका 3-1 ने जिंकली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. ज्यात भारताने मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 135 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
टीम इंडियाने आणखी एक टी-20 मालिका जिंकली आहे. या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली होती. मात्र यातील काही खेळाडू बाहेरच बसून राहिले. तर या बातमीद्वारे जाणून घेऊयात टीम इंडियाचे ते 3 खेळाडू जे या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकही सामना खेळू शकले नाहीत.
3. विजयकुमार वैशाख
कर्नाटकचा युवा वेगवान गोलंदाज विजयकुमार वैशाखला टीम इंडियात पहिली संधी मिळाली. जिथे त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संघात स्थान मिळवले होते. विजयकुमारने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी शानदार गोलंदाजी केली. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्येही छाप सोडली. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पदार्पण करण्याची संधी मिळू शकली नाही. संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तो बेंचवर बसून राहिला.
2. जितेश शर्मा
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला त्याच्या आयपीएलमधील उत्कृष्ट खेळामुळे टीम इंडियामध्ये संधी मिळाली. त्याने भारतासाठी काही सामने खेळले असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला पुन्हा संधी मिळाली. पण प्रोटीज दौऱ्यात तो प्लेइंग-11 पासून पूर्णपणे दूर राहिला. या 4 सामन्यांच्या टी20 मध्ये डगआउट सीटवर बसताना दिसला.
1. यश दयाल
भारतीय क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज यश दयालला पुन्हा एकदा रिकाम्या हाताने परतावे लागले. आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर उत्तर प्रदेशच्या या युवा वेगवान गोलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियामध्ये निश्चितपणे स्थान निर्माण केले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि संपूर्ण मालिकेत बेंचवर दिसला.
हेही वाचा-
याला म्हणतात ‘देशप्रेम’! सूर्यकुमार यादवनं असे काही केलं ज्याने सर्वांचे मन जिंकले, पाहा VIDEO
कर्णधार असावा तर असा! तिलक वर्मासाठी सूर्यानं केला मोठा त्याग, जाणून घ्या
“याबद्दल कॅप्टन सूर्याचे आभार… “, मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर तिलक वर्मा काय म्हणाला…