Suryakumar Yadav Record: सूर्यकुमार यादव याला त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे टी20 स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाते. सूर्या टी20त मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटकेबाजी करतो. त्याने मागील काही काळापासून भारतीय संघासाठी टी20 क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. आता तो मॅच विनर म्हणून पुढे आला आहे. त्याने भारतीय संघाला आपल्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यातही त्याने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. अशात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील तिसरा टी20 सामना 14 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. अशात भारतीय चाहत्यांना त्याच्याकडून तिसऱ्या टी20तही मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. याव्यतिरिक्त सूर्याकडे खास विक्रम रचण्याचीही संधी आहे.
विराटचा विक्रम धोक्यात
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) तिसऱ्या टी20 सामन्यात फक्त 3 षटकार मारताच दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याचा विक्रम मोडीत काढू शकतो. सूर्यकुमारने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 115 षटकार मारले आहेत. त्याने तिसऱ्या टी20त जर 3 षटकार मारले, तर तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी दुसरा सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनेल. तो विराट कोहलीलाही मागे टाकेल. विराटने भारताकडून टी20त 117 षटकार मारले आहेत. तसेच, रोहित शर्मा या विक्रमात अव्वलस्थानी असून त्याने भारताकडून टी20त 182 षटकार मारले आहेत.
टी20 सामन्यात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
182 षटकार- रोहित शर्मा
117 षटकार- विराट कोहली
115 षटकार- सूर्यकुमार यादव*
99 षटकार- केएल राहुल
74 षटकार- युवराज सिंग
टी20त 3 शतके
टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव याचे वेगळेच रूप पाहायला मिळते. तो वनडेच्या तुलनेत टी20त खूपच जबरदस्त फलंदाजी करताना दिसतो. त्याने भारताकडून 2021मध्ये टी20त पदार्पण केले होते. तसेच, त्याने भारतासाठी आतापर्यंत 59 टी20 सामन्यात 2041 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 3 शतकेही झळकावली आहेत. यादरम्यान 117 ही त्याची टी20तील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर (ind vs sa 3rd t20 most sixes for indian team t20 suryakumar yadav king virat kohli)
हेही वाचा-
सोशल मीडिया वादानंतर मैदानावर आमने-सामने आले पाकिस्तान अन् इंग्लंडचे दिग्गज, फोटो व्हायरल
दुसऱ्या टी20तून बाहेर असलेल्या बिश्नोईविषयी गावसकरांचे मोठे विधान; म्हणाले, ‘तो अजूनही…’