---Advertisement---

‘या’ ५ खेळाडूंचा टाईम येणार तरी कधी? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी केले दुर्लक्षित

On: शनिवार, जून 4, 2022 9:56 PM
Sanju-Samson-And-Rahul-Tripathi-And-Shikhar-Dhawan
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली गेली आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग या युवा खेळाडूंना आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी पहिल्यांदा भारतीय संघात निवडले गेले आहे. परण तरीदेखील असे खाही खेळाडू आहेत, ज्यांना आयपीएल २०२२ मध्ये चांगले प्रदर्शन करून देखील निवडकर्त्यांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटत आहे. चला तर अशा पाच खेळाडूंची माहिती घेऊ, ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निवडले गेले पाहिजे होते.

शिखर धवन
भारतीय दिग्गज शिखर धवन (Shikhar Dhawan) याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निवडले गेले नाहीये. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये १४ सामन्यांमध्ये १२२.६७च्या स्ट्राईक रेटने ४६० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या तीन अर्धशतकांचा देखील समावेश आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीचा विचार केला, तर ६८ सामन्यांमधील ६६ डावांमध्ये त्याने १७५८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १२६.६६ होता. त्याची आजपर्यंतची कारकीर्द आणि आयपीएल २०२२ मधील प्रदर्शन पाहून देखील निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

संजू सॅमसन
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाही, त्यांच्यात दुसरे प्रमुख नाव म्हणजे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson). त्याने आयपीएल २०२२ मध्ये दमदार प्रदर्शन केलेच, पण स्वतःच्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला. सॅमसन भारतासाठी सलामी किंवा मध्यक्रमात चांगले प्रदर्शन करू शकत होता. त्याच्याकडे १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांचा अनुभव आहे, पण तरीदेखील त्याला वारंवार संघातून बाहेर ठेवले गेले आहे.

राहुल त्रिपाठी
यादीत तिसरे नाव आहे राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याचे. राहुल फिरकी आणि वेगवान गोलंदाजांचा चांगल्याप्रकारे सामना करू शकतो. यावर्षी त्याने १४ आयपीएल सामन्यांमध्ये १५८च्या स्ट्राईक रेटने ४१३ धावा केल्या आहेत. त्याचे चांगले प्रदर्शन पाहून देखील निवडकर्त्यांनी त्याला संघात सहभागी करण्याचा विचार केला नाही. राहुल मध्यक्रमात चांगले प्रदर्शन करूच शकतो, पण वेळप्रसंगी तो डावाची सुरुवात देखील करतो. एवढेच नाही, त्याने संघाला गरज पडल्यावर अनेकदा फिनिशरची देखील भूमिका पार पाडली आहे.

मोहसिन खान
मोहसिन खान (Mohsin Khan) याला देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडले गेले पाहिजे होते, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. आयपीएल २०२२मध्ये अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने हंगामातील ९ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. तो ताशी १५० किमीच्या गतीने गोलंदाजी करू शकतो. हेवी बॉल आणि लेट स्विंग हे त्याचे कौशल्य आहे. त्याचे प्रदर्शन पाहून निवडकर्ते त्याला भारतीय संघात संधी देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही.

टी नटराजन
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेत वेगवान गोलंदाज टी-नटराजन (T Natarajan) यालाही संधी मिळाली पाहिजे होती. मात्र, निवडकर्त्यांनी त्याला संधी दिली नाही. नटराजनने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, पण मागच्या वर्षी गुडघ्याला झालेल्या दुखापतीनंतर त्याला मोठी विश्रांती घ्यावी लागली. असे असले, तरी त्याने आयपीएल २०२२मध्ये दमदार पुनरागमन केले. या हंगामात त्याने ११ सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या-

भविष्यात कसोटी धोक्यात, पण ‘हे’ ३ देश वाचणार, आयसीसीच्या अध्यक्षांचं धक्कादायक वक्तव्य

टी२० क्रिकेटमध्ये ‘हा’ संघ अवघ्या ८ धावांवर परतला तंबूत, मग विरोधी संघानेही ७ चेंडूत जिंकला सामना

मुलींच्या हट्टासाठी गाण्यावर थिरकला डेविड वॉर्नर, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---