Irfan Pathan On Sai Sudharsan: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 17 डिसेंबर) खेळला गेला. हा सामना जोहान्सबर्ग येथील न्यू वाँडरर्स स्टेडिअममध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाकडून 22 वर्षीय विस्फोटक फलंदाज साई सुदर्शन याने वनडे पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने वादळी अर्धशतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने यावेळी 43 चेंडूत नाबाद 55 धावांची खेळी केली. यामध्ये 9 चौकारांचा समावेश होता. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण हादेखील सुदर्शनची खेळी पाहून प्रभावित झाला. त्याने भविष्यवाणी केली की, सुदर्शन भारताकडून दीर्घ काळ खेळू शकतो.
काय म्हणाला इरफान?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इरफान पठाण (Irfan Pathan) म्हणाला की, साई सुदर्शन (Sai Sudharsan) भारतीय संघासाठी पुढील 10 ते 15 वर्षे (Sai Sudharsan Can Play 10-15 Years) खेळू शकतो. पठाण म्हणाला, “जर कोणी दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीवर अशी फलंदाजी करत असेल, तर मला वाटते की, तुम्ही एका अशा खेळाडूला शोधले आहे, जो भारतीय संघासाठी 10 ते 15 वर्षे खेळू शकतो. ही खूप घाई ठरेल, पण एक असाधारण सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार आला. त्यामुळे त्याची खूपच चांगली सुरुवात आहे.”
‘परिपक्व वाटतो’
पुढे बोलताना इरफान असेही म्हणाला की, “जेव्हा तुम्ही त्याला फलंदाजी करताना पाहता, तेव्हा तो सरळ असतो, शॉर्ट बॉल चांगला खेळतो, पायांचा चांगला वापर करतो. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंविरुद्ध चांगला खेळतो आणि खूपच परिपक्व वाटतो.”
भारताचा दणदणीत विजय
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच वनडे सामना होता. या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना फक्त 27.2 षटकात 116 धावांवर गुडघे टेकले. भारताकडून गोलंदाजी करताना यावेळी अर्शदीप सिंग चमकला. त्याने 10 षटकात 37 धावा खर्च करत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. आफ्रिकेच्या 117 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 16.4 षटकात 2 विकेट्स गमावत आव्हान पार केले. यावेळी सुदर्शनव्यतिरिक्त (55) श्रेयस अय्यर यानेही 45 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. या विजयासह भारताने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. (ind vs sa former cricketer irfan pathan predict batter sai sudharsan can play for indian team for next 10 15 years)
हेही वाचा-
‘माझ्या मते तो कर्णधार बनण्याच्या…’, हार्दिक पंड्याविषयी माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान
ब्रेकिंग! नवीन उल हकवर ‘या’ टी20 लीगमधून 20 महिन्यांची बंदी, नेमकं प्रकरण काय? लगेच वाचा