भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका गुरुवारी (९ जून) सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्ली स्थित अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. केएल राहुल या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे आणि त्याच्यासाठी ही मालिका अतिशय महत्वाची असणार आहे. ही पहिली वेळ आहे, जेव्हा राहुल टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. चला तर राहुलचे कर्णधाराच्या रूपातील आजपर्यंतचे प्रदर्शन पाहू.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत सहभाग घेणार नाहीये. अशात केएल राहुल (KL Rahul) भारताच्या टी-२० संघाचे पहिल्यांदा नेतृत्व करताना दिसेल. यापूर्वी त्याने भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे, पण टी-२० संघाचे नेतृत्व तो पहिल्यांदा करत आहे. कर्णधार राहुलसोबत या मालिकेत भारताचा युवा संघ आहे आणि मालिका जिंकण्याची जबाबदारी सर्वात जास्त त्याच्या खांद्यावर आहे.
भारतीय संघाच्या कर्णधाराच्या रूपात राहुल अद्याप यशस्वी झाला नाहीये. त्याने यापूर्वी एका कसोटी सामन्यात आणि तीन एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्याला या एकमात्र कसोटी सामन्यासह नेतृत्व केलेल्या सर्वा एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. म्हणजेच राहुलला आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्णधाराच्या रूपात अजून एकही विजय मिळाला नाहीये. अशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याच्या नेतृत्वातील भारतीय संघ विजयी झाल्यानंतर तो राहुलसाठी खास असणार आहे.
आफ्रिकी संघाविरुद्ध जर भारताला पहिला सामना जिंकता आला नाही, तर राहुल दिग्गज विराट कोहलीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी करेल. विराट देखील जेव्हा भारताचा कर्णधार बनला होता, तेव्हा त्याने देखील पहिला कसोटी, पहिला एकदिवसीय आणि पहिला टी-२० सामना गमावला होता. आता राहुलच्या नावावर अशाच विक्रम नोंदवला जाऊ शकतो. जर असे झाले, तर विराटनंतर राहुल दुसरा असा भारतीय कर्णधार असेल, ज्याच्या नेतृत्वातील पहिला कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामना संघालने गमावला असेल.
दरम्यान, आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत निवडकर्त्यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. आगामी काळातीस संघाचे व्यस्त वेळापत्र लक्षात घेऊन निवडकरत्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकातील सरासरी प्रदर्शनानंतरही भारतीय क्रिकेटर टॉप-१०मध्ये कायम, स्म्रीती ‘या’ स्थानी कायम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी टीम इंडियामध्ये बदल, ‘या’ महत्त्वाच्या सदस्याची एन्ट्री
अश्विनला पछाडत चहल बनणार टी२० क्रिकेटचा किंग! नंबर १ बनण्यापासून फक्त इतक्या विकेट्सने दूर