भारतीय संघ (team india) १६ डिसेंबरला दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. २६ डिसेंबरला भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेची (south africa vs india test series) सुरुवात होईल. दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी (lungi ngidi) याला मालिकेसाठी संघात स्थान दिले गेले आहे. अशात एन्गिडीने या मालिकेसंदर्भात महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते मायदेशातील ही मालिका दक्षिण अफ्रिका संघाला एका योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल. तसेच ज्या खेळाडूंना या मालिकेतून माघार घ्यायची आहे त्याचाविषयी देखील त्याने मोठे विधान केले आहे.
दक्षिण अफ्रिका संघासाठी ही त्यांची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलीच मालिका आहे. एन्गिडी या मालिकेतून चांगली सुरुवात करू इच्छित आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना एन्गिडी म्हणाला की, “अशाप्रकारचा दौरा गोष्टींना योग्य दिशेने पुढे घेऊन जाऊ शकतो. आम्ही ज्या प्रक्रियेवर चालत आहेत, त्यामुळे आम्ही या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आव्हान देण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत. आम्ही पूर्णरचनेच्या टप्प्यावर बोलत होतो, पण मला वाटते की हे एकत्र येण्याविषयी आहे.”
दक्षिण अफ्रिका संघाचे गोलंदाजी आक्रमण दमदार आहे. मात्र, भारतीय संघ देखील त्यांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. एन्गिडी पुढे म्हणाला की, “आमच्यामध्ये चांगली स्पर्धा आहे आणि मी याविषयी उत्सुक आहे. यामुळे खेळाडूंना चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रेरणा मिळते. मला नाही वाटत की, यावेळी कोणताही संघ निश्चिंत असेल.”
खेळाडूंना मालिका सुरु होण्यापूर्वी काही दिवस बायो बबलमध्ये प्रवेश करावा लागणार आहे आणि मालिका संपेपर्यंत बाहेरच्या जगाशी खेळाडूंचा कसलाही संपर्क नसणार आहे. अशात जर कोणत्या खेळाडूला बायो बबलच्या कारणास्तव मालिकेतून माघार घ्यायची असेल, तर एन्गिडीने त्याचे स्वागत केले आहे. तो म्हणाला, “मी त्या व्यक्तिंचा पूर्ण सन्मान करतो, जे दौऱ्यातून माघार घेऊ इच्छितात. कारण, मानसिक स्वरूपात त्याला असे वाटते की, तो याला (बायो बबल) पार करू शकणार नाही. कदाचित कधीतरी मलाही असे वाटले होते, पण मी त्या स्थितीत पोहोचलो नाही, जेथे मी घरी जाण्यासाठी तयार झालो.”
दक्षिण अफ्रिकेचे गोलंदाजी प्रशिक्षक चार्ल्स लेंगवेल्ट म्हणाले की, “आमच्याकडे आता चांगले खेळाडू आहेत आणि आम्ही आता वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संघासोबत प्रयोग करत आहोत. त्यामुळे मला वाटते की, या धाडसी निर्णयामुळे आम्ही चांगल्या स्थितीत आहोत आणि प्रत्यक्षात परिणाम मिळत आहेत.”
महत्वाच्या बातम्या –
माजी सलामीवीराने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’; चार भारतीयांना मिळाली जागा
“आपण ९ वर्षात अनेक आयसीसी ट्रॉफी जिंकू”; बीसीसीआय अध्यक्षांनी तयार केला प्लॅन
साहाचा उत्तराधिकारी गाजवतोय विजय हजारे ट्रॉफी; दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मिळणार संधी?