---Advertisement---

साहाचा उत्तराधिकारी गाजवतोय विजय हजारे ट्रॉफी; दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मिळणार संधी?

ks-bharath
---Advertisement---

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिका दौऱ्यात (India Tour Of South Africa) तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी अजून संघ जाहीर केलेला नाही. त्यामुळे सध्या चालू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी २०२१/२२ मध्ये (Vijay Hazare Trophy) बरेच खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करून निवडकर्त्यांच्या नजरेत येत आहे. आता झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीत यष्टीरक्षक वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी येऊन उत्कृष्ट यष्टिरक्षण करणाऱ्या श्रीकर भरतने (Srikar Bharat) विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) शतक झळकावले आहे.

आंध्र प्रदेश साठी खेळणाऱ्या श्रीकर भरतने रविवारी हिमाचल प्रदेश विरुद्ध १०९ चेंडूत १६१ धावा करून तो फक्त कसोटीच नाही तर वनडे सामने सुद्धा खेळू शकतो हे सांगितले आहे. त्याने हिमाचल प्रदेश विरुद्ध १०९ चेंडूत १६१ धावा केल्या ज्यात १६ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. यामुळे भरत एक चांगला फलंदाज सुद्धा आहे. याच कारणाने त्याला फक्त यष्टिरक्षक म्हणून चालणार नाही. या प्रदर्शनाचा फायदा त्याला आगामी आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी होणाऱ्या मेगा लिलावात (Mega Auction) होईल.

साहाचे वाढते वय आणि सारख्या होणाऱ्या दुखापती यामुळे संघात त्याची जागा भक्कम नाही. अश्यातच ही भरतसाठी सुवर्णसंधी आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी साहा आणि पंत दोघांना यष्टिरक्षक म्हणून घेण्यात आले आहे. भरत असेच प्रदर्शन देत राहिला तर त्याला देखील संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून घेण्यात येईल. भरत याने नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत साहा दुखापतग्रस्त असताना यष्टीरक्षण केले होते. यापूर्वी आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धात आरसीबी संघासाठी त्याने शानदार फलंदाजी करत आपली छाप सोडली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

थेट रोहित शर्माची जागा घेणारा प्रियांक पांचाल आहे तरी कोण? प्रथम श्रेणीत ठोकलीत २४ शतके

रोहितच्या संगीत सोहळ्यात विराटने सोनाक्षी सिन्हासोबत केलेला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

‘ऋतूराजला आता टीममध्ये घ्या, २८व्या वर्षी घेऊन काय करणार?’ ‘या’ दिग्गजाचा मोलाचा सल्ला

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---