---Advertisement---

कर्णधार पंतसह संघातील ‘या’ चार खेळाडूंनी केलंय निराश, पाहा कामगिरी

Pant-
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सध्या खेळल्या जात असलेल्या टी-२० मालिकेचा दुसरा सामना रविवारी (१२ जून) पार पडला. भारताला या सामन्यात ४ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला, जो मालिकेतील संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला. आफ्रिकी संघ टी-२० मालिकेत सध्या २-० अशा आघाडीवर आहे. कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघातील काही असे खेळाडू होते, त्यांची खूपच निराशाजनक प्रदर्शन केले. आपण या लेखात अशाच चार भारतीय खेळाडूंची माहिती घेणार आहोत.

१. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)
भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही टी-२० सामन्यात अपयशी ठरला आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने चार चेंडूत फक्त एक धाव केली आणि विकेट गमावली. डावाच्या पहिल्याच षटकात कागिसो रबाडाने त्याला तंबूत धाडले. स्वस्तात बाद झाल्यामुळे भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात मिळू शकली नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील ऋतुराजने अवघ्या २३ धावांवर विकेट गमावली होती.

२. रिषभ पंत (Rishabh Pant)
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. कर्णधाराच्या रूपात त्याची सुरुवात निरशाजनक राहिली आहे, कारण भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. पंत फक्त नेतृत्वातच नाही, तर वैयक्तिक प्रदर्शनात देखील अपयशी ठरला आहे. टी२० मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात पंतने ७ चेंडूत ५ धावा केल्या आणि विकेट गमावली. पंत बाद झाला, तेव्हा भारताला मध्यक्रमातील फलंदाजांकडून मोठ्या खेळीची गरज होती, पण पंत मोठी खेळी करू शकला नाही. केशव महाराजच्या चेंडूवर पंत झेलबाद झाला.

३. अक्षर पटेल (Axar Patel)
अष्टपैलू अक्षर पटेलला कर्णधार रिषभ पंतने या सामन्यात फक्त १ षटक गोलंदाजी करण्याची संधी दिली. या षटकात अक्षरने तब्बल १९ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेतली नाही. फलंदाजी करताना मात्र पंतने त्याल फॉर्ममध्ये असलेल्या दिनेश कार्तिकच्या आधी अक्षरला संधी दिली. त्याने ११ चेंडूत १० धावा केल्या आणि बाद झाला. अक्षरला कोणता विचार करून प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले गेले होते, याविषयी चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.

४. युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)
दिग्गज फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात एक विकेट नक्कीच घेतली. परंतु यादरम्यान त्याने धावा देखील जास्त खर्च केल्या. सामन्यात चहलने टाकलेल्या ४ षटकांमध्ये १२.२५ च्या इकॉनॉमीने ४९ धावा खर्च केल्या. समालोचक गौतम गंभीरने समालोचन करत असताना सांगितले की, चहलऐवजी रवी विश्नोईला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देता आली असती. तसेच ऋतुराज गायकवाडच्या जागी दीपक हुड्डाला संधी देता आली असती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

तृतिय श्रेणीत पुणेरी वॉरियर्स, भारती एफसी अंतिम लढत

कर्णधार पंतसह संघातील ‘या’ चार खेळाडूंनी केलंय निराश, पाहा कामगिरी

‘हार्दिक सध्याचा सर्वात वैविध्यपूर्ण खेळाडू’, भारताच्या माजी प्रशिक्षकाने केली पंड्याची प्रशंसा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---