भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका बुधवारी (28 सप्टेंबर) सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपूरम याठिकाणी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी आफ्रिकी संघाचा कर्णधार टेंबा बावुमा याची खास प्रतिक्रिया समोर येत आहे. बावुमाच्या मते भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी मालिकेत आफ्रिकी संघासाठी घातक ठरू शकतो.
टेंबा बावुमा (Temba Bavuma) याला असेही वाटते की, भारतीय खेळपट्टीवर नवीन चेंडूचा सामना करणे दक्षिण आफ्रिका संघासाठी सोपे नसेल. तो म्हणाला की, “नवीन चेंडूसह गोलंदाजांचा सामना करणे सोपे नसेल. ते चेंडू स्विंग करू शकतात. हे एक आव्हान आहे, ज्याचा सामना करण्यासाटी तुम्हाला स्वतःची रणनीती दाखवावी लागेल. संघाचे नुकसान कमी होऊ द्यायचे आणि विकेट्स कमी गमवायच्या, हे मुख्य लक्ष्य असेल. असे असले तरी, भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshear Kumar) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नेहमीच नवीन चेंडूने कडवे आव्हान देतात.”
दरम्यान, भुवनेश्वर कुमार या मालिकेत विश्रांतीवर असल्यामुळे आफ्रिकी संघाची चिंता काही प्रमाणात कमी होईल. भारतीय संघात सध्या जसप्रीत बुमराहसोबत उमेश यादव, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांचा समावेश केला गेला आहे. आफ्रिकी संघाविरुद्ध या चौघांपैकी कोणाला संधी मिळते आणि कोणाला बाहेर बसवले जाते, हे लवकरच समजेल. भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह खेळेल, याची खूपच कमी शक्यता आहे.
भारतीय संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका नावावर केली. मायदेशात खेळल्या गेलेल्या या मालिकेत पहिला सामना पाहुण्या ऑस्ट्रेलियाने जिंकला होता, पण पुढचे दोन्ही सामने यजमान भारताने जिंकले. मालिकेतील भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन पाहता आफ्रिकी संघासाठी देखील हा दौरा सोपा नसेल. असे असले तरी, दक्षिण आफ्रिका संघात देखील त्यांच्या प्रमुख खेळाडूंना सामील केले गेले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
खरंच गंभीरच्या कुत्र्याचं नाव ‘ओरिओ’ आहे? धोनी लाईव्ह आल्यानंतर गंभीरनेही शेअर केलाय व्हिडिओ
मालिकेआधीच दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने म्यान केली तलवार! पत्रकार परिषदेत म्हणाला…
पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक कसोटी मालिकेचा थरार? 15 वर्षांची प्रतीक्षा संपणार?